Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » विश्व मैत्री दिवस समस्त मानवतेचा उत्सव व्हावा – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

विश्व मैत्री दिवस समस्त मानवतेचा उत्सव व्हावा – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

विश्व मैत्री दिवस समस्त मानवतेचा उत्सव व्हावा – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

मुंबई, दि. ४ : भगवान महावीरांनी दिलेली सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्याची शिकवण ही केवळ धार्मिक तत्त्वे नसून शांततापूर्ण, न्यायपूर्ण आणि मानवी समाजाच्या निर्मितीचा आधार आहे. आज जग संघर्ष, युद्ध, असहिष्णुता आणि सामाजिक विभाजनाचा सामना करीत असताना भगवान महावीरांचा अहिंसा, क्षमा आणि मैत्रीचा संदेश अधिक प्रासंगिक झाला आहे. क्षमापना आणि विश्व मैत्रीचा संदेश हा केवळ एका धर्म किंवा समाजापुरता मर्यादित न राहता संपूर्ण मानवतेचा उत्सव बनावा, असे आवाहन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.

भारत जैन महामंडळातर्फे आराध्य भक्ती पार्क डोम, घाटकोपर (पूर्व), मुंबई येथे आयोजित सामूहिक क्षमापना, विश्व मैत्री दिवस आणि जैन समाज रत्न अलंकरण समारोहात राज्यपाल बोलत होते.राज्यपाल म्हणाले की, जैन दर्शनातील अनेकांतवाद आपल्याला सत्याचे अनेक पैलू असू शकतात, हे शिकवतो. इतरांचे दृष्टिकोन समजून घेणे, मतभेदांचा आदर करणे आणि संवादाच्या माध्यमातून समाधान शोधणे ही शांततेच्या दिशेने महत्त्वाची पावले आहेत. क्षमापना पर्व हे आत्मचिंतन, आत्मशुद्धी आणि संबंध सुधारण्याची संधी आहे. आपली चूक स्वीकारून इतरांची क्षमा मागणे ही कमजोरी नसून आंतरिक शक्तीचे प्रतीक आहे. ‘क्षमा वीरस्य भूषणम्’ ही उक्ती क्षमेचे महत्त्व अधोरेखित करते.

जैन धर्मातील मैत्रीचा भाव हा केवळ मानवापुरता मर्यादित नसून समस्त जीवसृष्टीप्रती करुणा, मैत्री आणि कल्याणाची भावना जोपासणारा आहे. प्रत्येक जीवाला आपल्यासमान मानल्यास हिंसा, शोषण आणि द्वेषापासून दूर राहता येते. क्षमा, करुणा आणि मैत्रीचा स्वीकार दैनंदिन जीवनात केल्यास सामाजिक संघर्ष आणि कटुता कमी होण्यास मदत होईल, असेही राज्यपालांनी सांगितले.

भगवान महावीरांच्या अहिंसेच्या परंपरेचा महात्मा गांधींच्या विचारांवरही प्रभाव होता. गांधीजींचे आध्यात्मिक मार्गदर्शक श्रीमद् राजचंद्रजी यांनी त्यांच्या विचारांना महत्त्वपूर्ण दिशा दिली. भगवान महावीरांची अहिंसेची परंपरा आणि श्रीमद् राजचंद्रजींचे आध्यात्मिक मार्गदर्शन यांनी गांधीजींच्या नैतिक चिंतनाला समृद्ध केले. ही भारताची महान सांस्कृतिक आणि सभ्यतागत परंपरा असल्याचे राज्यपालांनी नमूद केले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

बिबट्यांचा वाढता वावर; आता ठोस उपायांची गरज!

बिबट्यांचा वाढता वावर; आता ठोस उपायांची गरज! नाळेवाडीतील दोन वर्षांच्या चिमुकल्यावर हल्ल्याने चिंता वाढली; गोडोलीत कुत्र्याचे पिल्लू पळविल्याची घटनाही CCTVमध्ये

Live Cricket