राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ ते १८ डिसेंबरदरम्यान नागपूर येथे कोल्हापुरातील बाहुबली आणि कुंथुगिरी तीर्थक्षेत्रांच्या विकासाला गती देण्यात येणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीच्या बैठकीत तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला प्रशासकीय मान्यता पाल येथे १ कोटी ६८ लाख रुपयांच्या मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्पाचे उद्घाटन अर्थशॉट प्राईजच्या अंतिम स्पर्धकांशी वेल्सचे राजकुमार विल्यम यांचा संवाद महाबळेश्वर येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना १४ व्या स्मृतिदिनानिमित्त भावपूर्ण अभिवादन अदानीला झटका! साताऱ्यातील प्रकल्पाचे काम थांबविण्याची नोटीस
Home » राज्य » राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ ते १८ डिसेंबरदरम्यान नागपूर येथे

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ ते १८ डिसेंबरदरम्यान नागपूर येथे

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ ते १८ डिसेंबरदरम्यान नागपूर येथे

विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय

मुंबई, दि. १८ : महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवार, ७ डिसेंबर ते शुक्रवार, १८ डिसेंबर २०२६ या कालावधीत नागपूर येथे आयोजित करण्यात येणार आहे. विधानभवन येथे आयोजित विधानसभा आणि विधानपरिषदेच्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला.

या बैठकीला विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, उच्च व तंत्रशिक्षण तथा संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, विधानसभा सदस्य सुधीर मुनगंटीवार, दीपक केसरकर, नाना पटोले, विजय वडेट्टीवार जितेंद्र आव्हाड, सुनील प्रभू, अमीन पटेल, विधानपरिषद सदस्य अनिल परब, विक्रम काळे, सतेज पाटील, प्रवीण दरेकर आणि विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत आगामी हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीबाबत सविस्तर चर्चा करून ७ ते १८ डिसेंबर २०२६ या कालावधीत अधिवेशन आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच दोन आठवड्यांच्या विधिमंडळ कामकाजाच्या नियोजनाचा आढावा घेऊन त्याबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ ते १८ डिसेंबरदरम्यान नागपूर येथे

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ ते १८ डिसेंबरदरम्यान नागपूर येथे विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय मुंबई, दि. १८ :

कोल्हापुरातील बाहुबली आणि कुंथुगिरी तीर्थक्षेत्रांच्या विकासाला गती देण्यात येणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीच्या बैठकीत तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला प्रशासकीय मान्यता

Live Cricket