Home » ठळक बातम्या » महाबळेश्वर येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना १४ व्या स्मृतिदिनानिमित्त भावपूर्ण अभिवादन

महाबळेश्वर येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना १४ व्या स्मृतिदिनानिमित्त भावपूर्ण अभिवादन

महाबळेश्वर येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना १४ व्या स्मृतिदिनानिमित्त भावपूर्ण अभिवादन

​महाबळेश्वर (प्रतिनिधी):हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख स्वर्गीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या १४ व्या स्मृतिदिनानिमित्त महाबळेश्वर येथील बाळासाहेब ठाकरे चौकात त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. यावेळी महाबळेश्वर शहर व तालुक्यातील आजी-माजी पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​स्मृतिदिनानिमित्त बाळासाहेब ठाकरे चौकात आयोजित या कार्यक्रमात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे चालवण्याचा निर्धार व्यक्त केला.

​या अभिवादन प्रसंगी सातारा जिल्हाप्रमुख यशवंतजी घाडगे, माजी जिल्हाप्रमुख राजेश (बंडा) कुंभारदरे, शहर प्रमुख राजाभाऊ गुजर, शंकर ढेबे, ज्येष्ठ मार्गदर्शक प्रवीणभाऊ शिंदे, रमेशभाऊ शिंदे, प्रमोद शेटे, बँकेचे माजी व्यवस्थापक जगन्नाथ कोंढाळकर, अशोक शिंदे, राजेश साळवी, बाळासाहेब ढेबे, युवासेना संघटक आकाश साळुंखे, उस्मानभाई खारखंडे, शहानवाभाई खारखंडे, दीपक ताथवडेकर, प्रशांत मोरे, संजय ढेबे, सागर चिकणे, शशिकांत जाधव, माजी जिल्हा संघटिका लीलाताई शिंदे, राजश्रीताई भिसे, सुजाता मोरे, वसुधा बगाडे, पौर्णिमा मोहिते, ॲड. अरुण बावळेकर, किसन खामकर, अंकुश ऊलालकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.

​तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब पवार, दत्ताभाऊ बावळेकर यांच्यासह पत्रकार राहुल शेलार, मयूर दवे, रियाजभाई शेख, यश मोरे यांनीही उपस्थित राहून दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महाबळेश्वर येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना १४ व्या स्मृतिदिनानिमित्त भावपूर्ण अभिवादन

महाबळेश्वर येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना १४ व्या स्मृतिदिनानिमित्त भावपूर्ण अभिवादन ​महाबळेश्वर (प्रतिनिधी):हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख स्वर्गीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या १४

Live Cricket