राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ ते १८ डिसेंबरदरम्यान नागपूर येथे कोल्हापुरातील बाहुबली आणि कुंथुगिरी तीर्थक्षेत्रांच्या विकासाला गती देण्यात येणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीच्या बैठकीत तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला प्रशासकीय मान्यता पाल येथे १ कोटी ६८ लाख रुपयांच्या मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्पाचे उद्घाटन अर्थशॉट प्राईजच्या अंतिम स्पर्धकांशी वेल्सचे राजकुमार विल्यम यांचा संवाद महाबळेश्वर येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना १४ व्या स्मृतिदिनानिमित्त भावपूर्ण अभिवादन अदानीला झटका! साताऱ्यातील प्रकल्पाचे काम थांबविण्याची नोटीस
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » कोल्हापुरातील बाहुबली आणि कुंथुगिरी तीर्थक्षेत्रांच्या विकासाला गती देण्यात येणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीच्या बैठकीत तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला प्रशासकीय मान्यता

कोल्हापुरातील बाहुबली आणि कुंथुगिरी तीर्थक्षेत्रांच्या विकासाला गती देण्यात येणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीच्या बैठकीत तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला प्रशासकीय मान्यता

कोल्हापुरातील बाहुबली आणि कुंथुगिरी तीर्थक्षेत्रांच्या विकासाला गती देण्यात येणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीच्या बैठकीत तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला प्रशासकीय मान्यता

· १८ कोटी २० लाखांचा निधी मंजूर 

मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील महत्वाची श्रद्धास्थाने असलेल्या श्री क्षेत्र बाहुबली आणि श्री क्षेत्र कुंथुगिरी तीर्थक्षेत्रांच्या सर्वांगीण विकास आराखड्याला मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीच्या बैठकीत या दोन्ही तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्यातील एकूण १८ कोटी २० लाख ६४ हजार रुपयांच्या प्रस्तावित कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

विधान भवन येथील कॅबिनेट हॉल येथे झालेल्या बैठकीला नगरविकास राज्यमंत्री तथा कोल्हापूरच्या पालकमंत्री माधुरी मिसाळ, आमदार डॉ. अशोकराव माने, माजी आमदार प्रकाश आवाडे, वित्त विभागाचे प्रधान सचिव विजय वाघमारे, ग्रामविकास विभागाचे सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार उपस्थित होते. तसेच दूरदृश्यप्रणालीद्वारे पुणे विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी विजय राठोड आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जसमिन सहभागी झाल्या होत्या.

श्री क्षेत्र बाहुबलीसाठी ९ कोटींचा निधी

कोल्हापूर जिल्ह्यातील मौजे कसबा कुंभोज येथील श्री क्षेत्र बाहुबलीच्या विकासासाठी ९ कोटी रुपयांच्या आराखड्यातील कामांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये तीर्थक्षेत्र परिसरात पाथवे तयार करणे, शाळेच्या प्रांगणात पेव्हिंग ब्लॉक बसविणे व काँक्रिटीकरण करणे, भाविकांसाठी बसण्याकरिता बाकड्यांची व्यवस्था करणे, प्रशासकीय कार्यालयासमोर पेव्हिंग ब्लॉक बसविणे, अंतर्गत रस्त्यांच्या बाजूने सोलर स्ट्रीट लाईट उभारणे आदी कामांचा समावेश आहे.तसेच माईन कुंडी ते मुख्य मंदिराला जोडणाऱ्या अंतर्गत सिमेंट काँक्रिट रस्त्याचे बांधकामही करण्यात येणार आहे. या सुविधांमुळे तीर्थक्षेत्र परिसरातील अंतर्गत वाहतूक आणि भाविकांची ये-जा अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे.

श्री क्षेत्र कुंथुगिरीसाठी ९ कोटी २० लाखांहून अधिक निधी

हातकणंगले तालुक्यातील मौजे आळते येथील श्री क्षेत्र कुंथुगिरी तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी ९ कोटी २० लाख ६४ हजार रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये मंदिरासमोर पेव्हिंग ब्लॉक बसविणे, अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण, वाहनतळाचे काँक्रिटीकरण, उर्वरित संरक्षण भिंतीचे बांधकाम आदी कामे करण्यात येणार आहेत.

याशिवाय तीन हजार व्यक्तींची क्षमता असलेली आरसीसी सत्संग भवन इमारत उभारण्यात येणार आहे. या इमारतीमुळे धार्मिक कार्यक्रमासाठी भाविकांना प्रशस्त सुविधा उपलब्ध होणार आहे.या निर्णयामुळे श्री क्षेत्र बाहुबली आणि श्री क्षेत्र कुंथुगिरी येथे येणाऱ्या भाविकांना अधिक चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध होणार असून, तीर्थक्षेत्र परिसराचा नियोजनबद्ध विकास होण्यास मदत होणार आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ ते १८ डिसेंबरदरम्यान नागपूर येथे

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ ते १८ डिसेंबरदरम्यान नागपूर येथे विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय मुंबई, दि. १८ :

कोल्हापुरातील बाहुबली आणि कुंथुगिरी तीर्थक्षेत्रांच्या विकासाला गती देण्यात येणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीच्या बैठकीत तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला प्रशासकीय मान्यता

Live Cricket