आपापसातील वाद सामोपचाराने मिटविणे आणि लवकर न्याय मिळवून देणे हे लोक अदालतीचे उद्दिष्ट -न्यायमूर्ती राजेश पाटील महाबळेश्वर तालुका शहर व परिसर स्पा आणि मसाज पार्लरमध्ये भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्ती, फोटो व प्रतिमांचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांकडून होणारा अनादर रोखा; रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे निवेदन. महाबळेश्वरचे लोकप्रिय नगराध्यक्ष सुनील शिंदे यांच्या हस्ते ‘मीडिया सेवन’च्या गणेश आरती संग्रहाचे प्रकाशन मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन हमीभाव योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतक-यांचा अॅग्रीस्टॅक आयडी बंधनकारक विद्यार्थ्यांमधील क्रीडा गुणवत्ता योग्य वेळी हेरून त्यांना शास्त्रीय प्रशिक्षण देणार; आधुनिक फिटनेस चाचणीमुळे गुणवत्तावान खेळाडूंचा शोध घेण्यास मदत” — नगराध्यक्ष अमोल मोहिते.
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » रमाई आवास योजनेतील उर्वरित घरे डिसेंबरपर्यंत पूर्ण करा- जिल्हाधिकारी संतोष पाटील

रमाई आवास योजनेतील उर्वरित घरे डिसेंबरपर्यंत पूर्ण करा- जिल्हाधिकारी संतोष पाटील

रमाई आवास योजनेतील उर्वरित घरे डिसेंबरपर्यंत पूर्ण करा– जिल्हाधिकारी संतोष पाटील

सातारा : रमाई आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या प्रलंबित घरकुलांची कामे अत्यंत गतीने पूर्ण करून उर्वरित घरे डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले. 

जिल्हाधिकारी कार्यालयात रमाई आवास योजनेचा जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी सविस्तर आढावा घेतला. या आढावा बैठकीला समाज कल्याणचे सहायक आयुक्त सुनिल जाधव, नगर प्रशासन अधिकारी अभिजीत बापट यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

योजनेचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचवण्यासाठी संबंधित विभागाने वेगाने पावले उचलावती. आतापर्यंत २१४ लाभार्थ्यांना १०० टक्के हप्ता वितरित करण्यात आला आहे तर १९२ लाभार्थ्यांना दुसरा हप्ता देण्यात आला आहे.

उर्वरित घरकुलांचे बांधकाम तातडीने पूर्ण करून गरजू लाभार्थ्यांना हक्काचा निवारा मिळवून देण्यासाठी प्रशासकीय स्तरावर कामाचा वेग वाढवण्याच्या निर्देश देऊन जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत रमाई आवास योजनेतील उर्वरित सर्व घरकुलांचे काम पूर्णत्वास नेऊन ती लाभार्थ्यांच्या स्वाधीन करावीत. मंजूर घरकुलांचे बांधकाम सुरू झाले नसल्यास त्या विषयीच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत. 

तसेच सन 2011-2012 पासून प्रलंबीत असणाऱ्या प्रकरणांवर तातडीने निर्णय घ्यावा, अशा सूचना करुन जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी उपलब्ध निधी व सुरू असलेल्या कामांचा सविस्तर आढावा घेतला.रमाई आवास योजनेसाठी जिल्ह्यात आतापर्यंत 4 कोटी 21 लाख रुपये खर्च झाला असल्याचे समाज कल्याणचे सहायक आयुक्त श्री. जाधव यांनी बैठकीत सांगितले.तसेच नागरी वस्ती सुधार योजनेच्या कामांनाही गती देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री पाटील यांनी यावेळी दिल्या. 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

आपापसातील वाद सामोपचाराने मिटविणे आणि लवकर न्याय मिळवून देणे हे लोक अदालतीचे उद्दिष्ट -न्यायमूर्ती राजेश पाटील

आपापसातील वाद सामोपचाराने मिटविणे आणि लवकर न्याय मिळवून देणे हे लोक अदालतीचे उद्दिष्ट –न्यायमूर्ती राजेश पाटील सातारा – संवादाच्या माध्यमातून वाद

महाबळेश्वर तालुका शहर व परिसर स्पा आणि मसाज पार्लरमध्ये भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्ती, फोटो व प्रतिमांचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांकडून होणारा अनादर रोखा; रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे निवेदन.

Live Cricket