मेढा वनविभागाची कारवाई; विनापरवाना खैर वृक्षतोड प्रकरणी तिघे ताब्यात ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉलींना रिफ्लेक्टर लावा; अपघात टाळण्यासाठी रहिमतपूर पोलिसांची जनजागृती मोहीम रब्बी ज्वारी बियाणे मिनीकीट वितरणासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजने’च्या आर्थिक लाभात वाढ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोळशी येथे कार्यानुभव विषयांतर्गत कार्यशाळा उत्साहात संपन्न. आई-वडिलांच्या त्यागाची जाणीव ठेवा, उत्तम संस्कार जोपासा!” — प्रा. वसंत हंकारे  यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये ‘आई-बाप समजून घेताना’ प्रेरणादायी व्याख्यानातून विद्यार्थ्यांना भावनिक आवाहन
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » महाबळेश्वर तालुका शहर व परिसर स्पा आणि मसाज पार्लरमध्ये भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्ती, फोटो व प्रतिमांचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांकडून होणारा अनादर रोखा; रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे निवेदन.

महाबळेश्वर तालुका शहर व परिसर स्पा आणि मसाज पार्लरमध्ये भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्ती, फोटो व प्रतिमांचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांकडून होणारा अनादर रोखा; रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे निवेदन.

महाबळेश्वर तालुका शहर व परिसर स्पा आणि मसाज पार्लरमध्ये भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्ती, फोटो व प्रतिमांचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांकडून होणारा अनादर रोखा; रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे निवेदन.

​पाचगणी:महाबळेश्वर तालुक्यात शहर व परिसरातील विविध स्पा आणि मसाज पार्लर मध्ये भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्ती, फोटो व प्रतिमांचा व्यावसायिक वापर करून त्यांचा अनादर केला जात असल्याचा गंभीर प्रकार वारंवार निदर्शनास येत आहेत. याविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) आणि बौद्ध उपासक यांच्या कडून पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन त्वरित कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

​निवेदनात नमूद केल्यानुसार, महाबळेश्वर तालुका व परिसरातील काही स्पा व मसाज पार्लर धारकांनी आपल्या रिसेप्शन काउंटरवर, अंतर्गत भागात तसेच बाहेरील जाहिरात फलक किंवा मसाज सेवांच्या जाहिरातीं सोबत भगवान बुद्धांच्या प्रतिमा लावलेल्या दिसून येत आहेत.

​भगवान गौतम बुद्ध हे जागतिक शांतता, करूणा, त्याग आणि नैतिकतेचे प्रतीक आहेत. अशा पूजनीय महापुरुषांच्या प्रतिमांचा किंवा मूर्तींचा वापर केवळ ‘शोभेची वस्तू’ म्हणून किंवा मसाज पार्लर व स्पा सारख्या व्यावसायिक ठिकाणी जाहिरातीचे साधन म्हणून करणे अत्यंत अयोग्य व गंभीर स्वरूपाचे आहे. यामुळे समस्त बौद्ध प्रेमींच्या व भाविकांच्या धार्मिक भावना तीव्रतेने दुखावल्या जात आहेत.

​निवेदनाद्वारे खालील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत:

​पाचगणी व परिसरातील सर्व स्पा, मसाज पार्लर व सलोन चालकांना तातडीने सूचना देऊन जाहिरात फलकांवर किंवा व्यवसायाच्या ठिकाणी लावलेल्या भगवान बुद्धांच्या सर्व मूर्ती, फोटो व प्रतिमा सन्मानपूर्वक हटवण्याचे निर्देश देण्यात यावेत.

​आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर व धार्मिक भावनांचा अनादर करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी.या निवेदनावर आरपीआय (आठवले) महाबळेश्वर तालुकाध्यक्ष जॉन जोसेफ, महाबळेश्वर तालुका कार्याध्यक्ष अतिश (पप्पू) भोसले, बौद्धाचार्य प्रकाश खरात, पाचगणी शहर संघटक चंद्रकांत ईम्मन, रंजन बाबुराव कांबळे BSP माजी विधानसभा अध्यक्ष,नितीन वन्ने महाराष्ट्र राज्य.का.सु.दल जिल्हाध्यक्ष, विशाल कांबळे सचिव RPI ,सचिन दादासाहेब मोरे, राजेश केशव बगाडे RPI(आठवले ) माजी शहराध्यक्ष, रितेश वन्ने, किसन घाडगे, अंकुश कांबळे, तसेच यांच्यासह अन्य बुद्ध प्रेमी व पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.पोलीस प्रशासनाने या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी समस्त समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

मेढा वनविभागाची कारवाई; विनापरवाना खैर वृक्षतोड प्रकरणी तिघे ताब्यात

मेढा वनविभागाची कारवाई; विनापरवाना खैर वृक्षतोड प्रकरणी तिघे ताब्यात मेढा : जावळी तालुक्यातील डांगरेघर येथील मालकी क्षेत्रात विनापरवाना खैर वृक्षतोड

Live Cricket