हृदयविकार रुग्णांसाठी १२ रोजी सातारा, वाई येथे मोफत मार्गदर्शन शिबिर सकाळच्या नास्त्यात तर्री पोहा; शेतकरी कुटुंबात मुख्यमंत्र्यांची भाऊबीज पुढल्या वर्षी वहिनींना घेऊन या; अरूणाताईंचा मुख्यमंत्र्यांना आग्रह दिव्यांगांच्या आयुष्यात आशेचा प्रकाश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी साजरी केली दिव्यांग बांधवांसोबत आनंदाची दिवाळी! सातारा जिल्हा बँक निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल ह.भ.प. दत्तात्रय कळंबे महाराज नागरी बिगरशेती सहकारी पतसंस्थेतर्फे रूपाली राजपुरे व राजेंद्रशेठ राजपुरे यांचा सत्कार दुष्काळग्रस्त ८७ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना ४,३७२ कोटींची दिवाळी अग्रीम मदत-मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील दुष्काळी परिस्थितीत गायरान व वैयक्तिक जमिनीवर अतिरिक्त चारा पिकांच्या लागवडीला मान्यता-रोहयो मंत्री भरत गोगावले
Home » ठळक बातम्या » सेवा संकल्प अभियानांतर्गत कराड येथे महिला सक्षमीकरण आणि विविध योजनांबाबत मार्गदर्शन

सेवा संकल्प अभियानांतर्गत कराड येथे महिला सक्षमीकरण आणि विविध योजनांबाबत मार्गदर्शन

सेवा संकल्प अभियानांतर्गत कराड येथे महिला सक्षमीकरण आणि विविध योजनांबाबत मार्गदर्शन

सातारा -महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, सातारा अंतर्गत जिल्हा महिला सक्षमीकरण केंद्र व सखी वन स्टॉप सेंटरच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवली नागरी सहकारी बँक, कराड येथे ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.  

या प्रसंगी महिला सक्षमीकरण केंद्राच्या प्रतिनिधी रोहिणी जाधव यांनी उपस्थितांना महिला सक्षमीकरण केंद्र आणि सखी वन स्टॉप सेंटरच्या कामकाजाविषयी सविस्तर माहिती दिली. सेंटरच्या माध्यमातून हिंसाग्रस्त महिलांना दिल्या जाणाऱ्या विविध मोफत सुविधा, जसे की मानसोपचार समुपदेशन, वैद्यकीय सेवा, तात्काळ पोलीस मदत, कायदेशीर सल्ला व मार्गदर्शन, तसेच तात्पुरत्या निवासाची सोय यांबद्दल त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

यासोबतच आपत्कालीन परिस्थितीत महिलांच्या मदतीसाठी उपलब्ध महिला हेल्पलाइन: १८, चाइल्ड हेल्पलाइन: १०९८, पोलीस हेल्पलाइन: ११२, सायबर क्राईम हेल्पलाइन: १९३० या टोल फ्री क्रमांकांची माहिती देण्यात आली. याशिवाय कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम २००५, बाल संगोपन योजना, बालविवाह प्रतिबंध कायदा यांसारख्या विविध कायद्यांची व योजनांची माहिती महिलांना देण्यात आली.  

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

हृदयविकार रुग्णांसाठी १२ रोजी सातारा, वाई येथे मोफत मार्गदर्शन शिबिर

हृदयविकार रुग्णांसाठी १२ रोजी सातारा, वाई येथे मोफत मार्गदर्शन शिबिर सातारा : ताणतणावाच्या परिस्थितीमुळे, अचानक रक्तदाब वाढल्यामुळे अथवा चिंता, नैराश्य

Live Cricket