कराडच्या संतोष पाटील आणि श्रीकांत वारे दिग्दर्शित “आरंभकडा” लघुपटाची शिवप्रहार राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत अधिकृत निवड; ९६ दर्जेदार लघुपटांमध्ये कराडच्या भूमिपुत्रांची बाजी यशोदा कॉलेज ऑफ आर्किटेक्चरतर्फे ‘वर्ल्ड हेरिटेज वीक २०२६’ निमित्त विशेष उपक्रम साताऱ्याच्या तीन शिलेदारांची मलेशियाला झेप! सक्सेस अबॅकसच्या विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड सातारा जिल्ह्यातील ५ हजार ५७८ शेतकरी एकवेळ समझोता योजनेस पात्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत लाभार्थी याद्या प्रसिद्ध राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाची अवैध हातभट्टी दारुचे वाहतुकीवर धडक कारवाई 5 लाख 22 हजार 200 रुपयांचा मुददेमाल जप्त साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळार्फत कर्ज योजना
Home » राज्य » गोकुळ’ निवडणुकीत सतेज पाटलांचा दबदबा; महायुतीचे गणित बिघडले!

गोकुळ’ निवडणुकीत सतेज पाटलांचा दबदबा; महायुतीचे गणित बिघडले!

गोकुळ’ निवडणुकीत सतेज पाटलांचा दबदबा; महायुतीचे गणित बिघडले!

कोल्हापूर :कोल्हापूरच्या सहकार सम्राज्यातील सर्वात प्रतिष्ठेचा किल्ला अर्थात गोकुळ दूध संघ अखेर काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील यांनी सर केला. राजकीय प्रतिष्ठेच्या पणाला लागलेल्या या महासंग्रामात सोमवारी विरोधी राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने २५ पैकी तब्बल १६ जागांवर विजयाचे सोने लुटले. महायुती प्रणित सत्ताधारी राजर्षी शाहू विकास आघाडीला अवघ्या ९ जागांवरच समाधान मानावे लागले आहे.

राज्यातील सहकार तत्वावरील सर्वात मोठ्या गोकुळ दूध संघाची निवडणूक राज्यातील महायुतीने प्रतिष्ठेची केली होती. मुख्यमंत्र्यांपासून ते जिल्ह्यातील महायुतीच्या तमाम नेत्यांनी प्रचाराची राळ उठवली होती. तर विरोधात काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी एक हाती प्रचार यंत्रणा राबवली होती. आज मतमोजणीत सकाळी ११ वाजता ५ हजार ४१४ मतांपैकी पहिल्या १६५० मतांमध्ये महायुतीने आघाडी घेतली होती.

मात्र दुपारनंतर पडदा सरकला आणि समविचारी आघाडीने अशी काही मुसंडी मारली. हातकणंगले, शिरोळ, पन्हाळ्याच्या पट्ट्यातून एकमुखी कौल मिळत गेला. या निकालातील सर्वात मोठा धक्का म्हणजे गोकुळचे विद्यमान साम्राज्य हलवणारे महायुतीचे शिलेदार मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव, मावळते अध्यक्ष नविद मुश्रीफ यांना ओबीसी गटातून समविचारीचे शशिकांत खोत यांनी ६९ मतांनी हरविले तर त्यांच्यासह गोकुळचे अरुण डोंगळे, विश्वास पाटील या माजी अध्यक्षांना पराभवाची धूळ चाखावी लागली. गतवेळी विरोधी गटाचा गटाची जबाबदारी एक हाती पेलणाऱ्या शौमिका महाडिक यांचा अवघ्या ७ मतांनी झालेला नाट्यमय पराभव हा या निवडणुकीचा टर्निंग पॉईंट ठरला.

निकालाचे पडघम वाजताच विरोधातील नेत्यांचे चेहरे हिरमुसले होते. तर दुसरीकडेसतेज पाटील यांच्या अजिंक्यतारा या जनसंपर्क कार्यालयावर जणू दसऱ्यापूर्वीच दिवाळी अवतरली. हजारो शेतकरी, दूध उत्पादक आणि तरुण कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात सतेज पाटलांना खांद्यावर घेतले. गुलालाची मुक्त उधळण, फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. ठरावधारकांनी ‘गोकुळचा बाप शेतकरी हाय’, ‘कैवारी बंटी साहेब, ‘गोकुळ वाचला’च्या घोषणांनी आसमंत दणाणून गेला. फेरमतमोजणीचे नाट्य आवरल्यानंतर हा जल्लोष शिगेला पोहोचला. आता गोकुळच्या दूधगंगेतून सत्तांतराचा नवा प्रवाह वाहणार हे निकालाने स्पष्ट झाले आहे.

राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीचे विजयी उमेदवार

शशिकांत पाटील चुयेकर,

बाबासाहेब श्रीपती चौगुले,

अभिजित प्रभाकर तायशेटे,

किसन बापूसो चौगुले,

राहुल बजरंग देसाई,

बाबासाहेब विष्णू देवकर,

विश्वजित दिनकरराव जाधव,

विद्याधर बाबूराव गुरबे,

सचिन दौलतराव घोरपडे,

अंजना केदारी रेडेकर,

भाग्यश्री धीरज डोंगळे,

शशिकांत शामराव खोत,

राजू जयवंतराव आवळे,

बयाजी देवू शेळके.

महायुतीच्या राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीचे विजयी उमेदवार याप्रमाणे :

राजेश नरसिंगराव पाटील,

राहुल पी. पाटील,

रणजित के. पाटील,

रणजित दिलीप पाटील,

अंबरिशसिंह संजय घाटगे,

चेतन अरुण नरके,

अजित शशिकांत नरके,

अजित पांडुरंग पाटील,

वीरेंद्र संजय मंडलिक

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कराडच्या संतोष पाटील आणि श्रीकांत वारे दिग्दर्शित “आरंभकडा” लघुपटाची शिवप्रहार राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत अधिकृत निवड; ९६ दर्जेदार लघुपटांमध्ये कराडच्या भूमिपुत्रांची बाजी

कराडच्या संतोष पाटील आणि श्रीकांत वारे दिग्दर्शित “आरंभकडा” लघुपटाची शिवप्रहार राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत अधिकृत निवड; ९६ दर्जेदार लघुपटांमध्ये कराडच्या भूमिपुत्रांची

Live Cricket