Home » राज्य » प्रशासकीय » जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या अनुषंगाने अंतिम मतदार यादी सुधारित कार्यक्रम जाहीर-विक्रांत चव्हाण-उपजिल्हाधिकारी (महसूल)

जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या अनुषंगाने अंतिम मतदार यादी सुधारित कार्यक्रम जाहीर-विक्रांत चव्हाण-उपजिल्हाधिकारी (महसूल)

जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या अनुषंगाने अंतिम मतदार यादी सुधारित कार्यक्रम जाहीर-विक्रांत चव्हाण-उपजिल्हाधिकारी (महसूल)

सातारा दि. 4: जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या अनुषंगाने राज्य शासनाच्या सूचनेनुसार जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूकासाठी मतदार यादी तयार करण्याचा सुधारित कार्यक्रम जाहीर झाला आहे. यानुसार निवडणूक विभाग व निर्वाचक गणाच्या छापील मतदार याद्या अधिनियमाच्या कलम १३ खाली अधिप्रमाणित करण्याची तारीख 3 नोव्हेंबर 2025 होती. तसेच निवडणूक विभाग व निर्वाचक गणांच्या छापील अंतिम मतदार याद्या माहितीसाठी ठेवण्यात आल्या आहेत, याबाबतची सूचना प्रसिध्द करण्याची तारीख 3 नोव्हेंबर 2025 होती. मतदान केंद्राची यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिध्द करण्याची तारीख 12 नोव्हेंबर 2025 आहे.

यानुसार निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय अंतिम मतदार यादी सातारा जिल्हयातील सर्व तहसिल कार्यालयामध्ये त्या तालुक्याच्या कार्यक्षेत्रातील पंचायत समिती मधील ज्या त्या गट व गणनिहाय यादी दि.3 नोव्हेंबर 2025 रोजी प्रसिध्द करण्यात आलेली आहे. दि. 3 नोव्हेंबरपासून गट व गणनिहाय अंतिम मतदार याद्या कार्यालयीन वेळेत तहसिलदार कार्यालयामध्ये सर्व सर्वसामान्यांना पहावयास उपलब्ध केलेल्या आहेत. तर मतदान केंद्राची यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी दि. 12 नोव्हेंबर 2025 रोजी प्रसिध्द करण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण यांनी दिली.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नशामुक्त भारत अभियान अंतर्गत QR कोड स्कॅन करून व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा घेण्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आवाहन

Post Views: 60 नशामुक्त भारत अभियान अंतर्गत QR कोड स्कॅन करून व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा घेण्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आवाहन सातारा-भारत

Live Cricket