‘यशोदाच्या’ अनुष्का गाढवे हिचा राष्ट्रस्तरीय स्लोगन मेकिंग स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक
यशोदा टेक्निकल कॅम्पस मधील फार्मसी च्या अनुष्का गाढवे हिने राजारामबापू कॉलेज ऑफ फार्मसी कासेगाव आणि असोसिएशन ऑफ फार्मास्युटिकल टीचर्स ऑफ इंडिया (ए पी टी आय ) मार्फत ऑनलाईन राष्ट्रस्तरीय स्लोगन मेकिंग स्पर्धे घेण्यात आलेल्या.ऍडव्हर्स ड्रग रिऍक्शन (ए डी आर ) या विषयावरील स्पर्धेमध्ये राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केला.
या स्पर्धे मध्ये यशोदा शिक्षण संस्थेमधील फॅकल्टी ऑफ फार्मसी च्या तृतीय वर्ष बी फार्मसी च्या कु. अनुष्का गाढवे देशमुख हिने विजेतेपद पटकावले.
संपूर्ण महाराष्ट्रातल्या पुणे ,मुंबई ,सोलापूर ,शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांसारख्या विविध विद्यापीठामधून तसेच महाराष्ट्र बाहेरील आर.जी. यू. एच. एस. आणि के. एल. इ. अश्या अनेक विद्यापीठामधून ३५० हुन अधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेसाठी हजेरी दर्शवली होती.
यशोदा मध्ये स्टुडन्ट पार्टीसिपेशन इन आऊटसाईड इव्हेंट या पोर्टफोलिओ अंतर्गत विद्यार्थ्यांना बाहेरील स्पर्धे मध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्सहीत केले जाते आणि मार्गदर्शन दिले जाते. अनुष्काच्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दशरथ सगरे,उपाध्यक्ष अजिंक्य सगरे,संचालक प्राचार्य डॉ.व्ही.के.रेदासानी,विभाग प्रमुख डॉ.अविनाश भागवत यांनी तिचे कौतुक केले. प्रा वैष्णवी शेडगे यांनी मार्गदर्शन केले.