नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन
Home » देश » माजी सैनिकांसाठी 23 मे रोजी मेळाव्याचे आयोजन

माजी सैनिकांसाठी 23 मे रोजी मेळाव्याचे आयोजन

माजी सैनिकांसाठी 23 मे रोजी मेळाव्याचे आयोजन

सातारा दि. 13 : मुख्यालय महाराष्ट्र, गुजरात व गोवा क्षेत्र मार्फत १०९ इन्फंट्री बटालियन (टी. ए.) मराठा लाईट इन्फट्री या युनिट तर्फे माजी सैनिकांसाठी श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक भवन, शेंद्रे फाटा सातारा येथे २३ मे २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ३ या वेळेत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्यास कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांमधून ५ हजार माजी सैनिक सहभागी होणार आहेत. माजी सैनिकांचे विविध प्रश्न जसे की पेन्शन, पोलिस सहायता व जमीन यासारख्या प्रश्नांवर समाधान करण्यासाठी संपूर्ण अभिलेख कार्यालय, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना (ECHS), जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयामधून प्रतिनिधी बोलवण्यात आलेले आहेत तसेच माजी सैनिकांच्या वैद्यकीय सेवेसाठी वैद्यकीय शिबिर आयोजित केले आहे. मेळाव्यादरम्यान वीर माता, वीर पत्नी, वीर पिता व विविध युद्धात सहभागी असलेल्या सैनिकांचा सत्कार समारोह करण्यात येणार आहे. तरी सातारा जिल्ह्यातील माजी सैनिकांनी याचा लाभ घ्यावा

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ

नायगाव येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा केळघर/प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket