संयमी काका धुमाळ यांची सातारा जिल्हा बँकेत बिनविरोध निवड; श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजेंनी कार्यकर्त्यांना दिली ताकद! मतदानासाठी ११ प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य – विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले पांचगणीच्या शैक्षणिक क्षेत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव!अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी मीत जिग्नेश दुधात याची ICAI इंटरमिजिएट परीक्षेत देशात २२ वी रँक; ४६२ गुणांसह दैदीप्यमान यश महाबळेश्वर नगरपरिषदेची धडक कारवाई पॅनोरमा परिसरातील अतिक्रमणे हटवून रस्ता व फूटपाथ पर्यटकांसाठी केला मोकळा पुन्हा अतिक्रमण केल्यास दंडात्मक व कायदेशीर कारवाईचा इशारा जिल्हा परिषद शाळा कोडोली येथे जलसेवा संकल्प अभियानांतर्गत चित्रकला स्पर्धा व जलप्रतिज्ञा उपक्रम संपन्न सातारा येथे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त विवेकी पालकत्व विषयावर व्याख्यान संपन्न
Home » राज्य » शिक्षण » यशोदा टेक्निकल कॅम्पसला ‘स्वायत्त दर्जा’ चा बहुमान; तंत्र शिक्षणामध्ये नवीन उपक्रमांना प्राधान्य

यशोदा टेक्निकल कॅम्पसला ‘स्वायत्त दर्जा’ चा बहुमान; तंत्र शिक्षणामध्ये नवीन उपक्रमांना प्राधान्य

यशोदा टेक्निकल कॅम्पसला ‘स्वायत्त दर्जा’ चा बहुमान; तंत्र शिक्षणामध्ये नवीन उपक्रमांना प्राधान्य

सातारा : महाराष्ट्रातील तांत्रिक शिक्षण क्षेत्रात सातत्याने गुणवत्ता आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या यशोदा टेक्निकल कॅम्पस, सातारा या संस्थेला आता स्वायत्त (Autonomous) दर्जा प्राप्त झाला आहे. इंजीनियरिंग, फार्मसी, पॉलिटेक्निक, आर्किटेक्चर, एमबीए,एमसीए, बीबीए, बीसीए यासारख्या अभ्यासक्रमातून उच्च व तंत्र शिक्षणातील गुणवत्तावाढ, अभ्यासक्रमातील नाविन्यपूर्णता आणि उद्योगाभिमुख शिक्षणाला चालना देण्यासाठी हा दर्जा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या मान्यतेमुळे यशोदा टेक्निकल कॅम्पसला अभ्यासक्रम रचना, अध्यापन पद्धती, परीक्षा पद्धती आणि शैक्षणिक उपक्रमांमध्ये अधिक स्वायत्तता मिळणार आहे.

या स्वायत्त दर्जामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित, उद्योग क्षेत्राच्या गरजांशी सुसंगत असे अद्ययावत अभ्यासक्रम उपलब्ध करून देता येणार आहेत. त्याचबरोबर संशोधन, स्टार्टअप, उद्योजकता आणि कौशल्य विकास यांसारख्या क्षेत्रांनाही अधिक चालना मिळणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना केवळ पदवी मिळविण्यापुरते शिक्षण न देता त्यांना जागतिक स्पर्धेत सक्षम बनविण्याचा मार्ग अधिक सुकर होणार आहे.

स्वायत्ततेमुळे संस्थेला परीक्षा पद्धती अधिक पारदर्शक आणि परिणामकारक बनविणे, विद्यार्थ्यांच्या कौशल्यांचे सतत मूल्यमापन करणे तसेच उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्र यांच्यातील दुवा अधिक मजबूत करणे शक्य होणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या रोजगारक्षमतेत वाढ होण्यासही मोठी मदत होणार आहे.

या ऐतिहासिक यशाबद्दल संस्थेच्या व्यवस्थापनाने कुलसचिव, सहसंचालक, प्राचार्य, विभाग प्रमुख, शिक्षकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, आजी माजी विद्यार्थी, पालक तसेच सर्व हितचिंतकांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत. यशोदा टेक्निकल कॅम्पसच्या या यशामुळे सातारा जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात एक नवे पर्व सुरू झाले असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.

याबाबत बोलताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. दशरथ सगरे यांनी सांगितले की, “यशोदा टेक्निकल कॅम्पसला प्राप्त झालेला स्वायत्त दर्जा हा आमच्या संपूर्ण संस्थेसाठी अत्यंत अभिमानाचा आणि ऐतिहासिक क्षण आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही गुणवत्तापूर्ण शिक्षण, संशोधन आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करत आलो आहोत. या प्रयत्नांची दखल घेऊन मिळालेली ही मान्यता म्हणजे आमच्या संपूर्ण शिक्षकवर्ग, कर्मचारी, विद्यार्थी आणि हितचिंतकांच्या परिश्रमांचे फळ आहे. स्वायत्ततेमुळे आम्हाला विद्यार्थ्यांसाठी अधिक आधुनिक, उद्योगाभिमुख आणि कौशल्याधारित अभ्यासक्रम राबविण्याची संधी मिळणार आहे.” 

संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. अजिंक्य सगरे यांनी यावेळी सांगितले की, “आजच्या वेगाने बदलणाऱ्या तांत्रिक जगात विद्यार्थ्यांना अद्ययावत ज्ञान आणि कौशल्ये देणे अत्यंत गरजेचे आहे. स्वायत्त दर्जामुळे आम्हाला अभ्यासक्रमात नाविन्यपूर्ण बदल करण्याची आणि उद्योग क्षेत्राशी अधिक मजबूत संबंध निर्माण करण्याची संधी मिळेल. संशोधन, स्टार्टअप, इन्क्युबेशन आणि उद्योजकता विकास या क्षेत्रांमध्येही आम्ही अधिक प्रभावीपणे काम करू शकू. यामुळे यशोदा टेक्निकल कॅम्पस विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण देणारे केंद्र म्हणून पुढे येईल.”

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

संयमी काका धुमाळ यांची सातारा जिल्हा बँकेत बिनविरोध निवड; श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजेंनी कार्यकर्त्यांना दिली ताकद!

संयमी काका धुमाळ यांची सातारा जिल्हा बँकेत बिनविरोध निवड; श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजेंनी कार्यकर्त्यांना दिली ताकद! सातारा : सातारा जिल्हा

पांचगणीच्या शैक्षणिक क्षेत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव!अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी मीत जिग्नेश दुधात याची ICAI इंटरमिजिएट परीक्षेत देशात २२ वी रँक; ४६२ गुणांसह दैदीप्यमान यश

Live Cricket