नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन
Home » राज्य » शिक्षण » यशोदा पब्लिक स्कूलचा सीबीएसई बोर्ड १२ वी परीक्षेत दैदिप्यमान यश १००% निकालाची उज्ज्वल परंपरा कायम

यशोदा पब्लिक स्कूलचा सीबीएसई बोर्ड १२ वी परीक्षेत दैदिप्यमान यश १००% निकालाची उज्ज्वल परंपरा कायम

यशोदा पब्लिक स्कूलचा सीबीएसई बोर्ड १२ वी परीक्षेत दैदिप्यमान यश १००% निकालाची उज्ज्वल परंपरा कायम

सातारा : यशोदा शिक्षण संस्थेअंतर्गत कार्यरत यशोदा पब्लिक स्कूल ने यंदाच्या सीबीएसई (CBSE) इयत्ता १२ वी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत शाळेची १००% निकालाची परंपरा कायम राखली आहे. विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुणवत्तेची कामगिरी करत शाळेच्या शैक्षणिक दर्जाची पुन्हा एकदा प्रचिती दिली.

या परीक्षेत विद्यार्थ्यांनी उच्च गुण प्राप्त करून शाळेचा नावलौकिक वाढवला आहे. गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये सान्वी नितीन पवार हिने ८७.८% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. रुद्र निशांत शहा याने ८३.८% गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला, तर ईश्वरी प्रशांत नागतिळक हिने ८०.६% गुण मिळवत तृतीय क्रमांक संपादन केला. या सर्व विद्यार्थ्यांचे पालक, शिक्षक आणि संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल बोलताना यशोदा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. दशरथ सगरे यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांचा सातत्यपूर्ण अभ्यास, पालकांचे सहकार्य आणि शिक्षकांचे समर्पित मार्गदर्शन यामुळे हे यश शक्य झाले आहे. विद्यार्थ्यांनी केवळ गुणांमध्येच नव्हे तर आत्मविश्वास, शिस्त आणि मूल्याधिष्ठित शिक्षणातही प्रगती करावी, हीच संस्थेची भूमिका आहे.”

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष प्रा डॉ अजिंक्य सगरे यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील शैक्षणिक आणि व्यावसायिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, “यशोदा पब्लिक स्कूल विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आधुनिक शिक्षणपद्धती, गुणवत्तापूर्ण अध्यापन आणि स्पर्धात्मक वातावरण उपलब्ध करून देत आहे. विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश संपूर्ण संस्थेसाठी अभिमानाची बाब आहे.”

शाळेचे प्राचार्य, शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या यशासाठी विशेष परिश्रम घेतले. या निकालामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून जिल्हाभरातून यशस्वी विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ

नायगाव येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा केळघर/प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket