यशोदा इन्स्टिट्यूट चा जागतिक औषधनिर्माता दिनानिमित्त समाजउपयोगी उपक्रम
आरोग्य चाचणी सोबत, रक्त तपासणी आणि जनजागृती पदयात्रेचे आयोजन
विद्यार्थ्यांना व्यवसायिक शिक्षणासोबतच समाजसेवेचे देखील धडे देता आले पाहिजे या संस्थापक-अध्यक्ष प्राध्यापक प्रा. दशरथ सगरे यांच्या विचारातून दरवर्षी राबविण्यात येणाऱ्या जनजागृती पद यात्रेचे तसेच आरोग्य तपासणीचे शिबिराचे आयोजन यशोदा टेक्निकल कॅम्पसच्या फॅकल्टी ऑफ डी फार्मसी विभागामार्फत ष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत म्हसवे येथे नुकतेच करण्यात आले होते.
जागतिक फार्मसीस्ट दिनाच्या निमित्ताने अशा प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन यशोदा टेक्निकल कॅम्पस च्या वतीने नियमित प्रमाणे करण्यात येते. आरोग्य विषयी जनजागृती घडवून आणण्याबरोबरच निरोगी आयुष्याचे रहस्य लोकांना समजावे. रक्तगट तपासणी, रक्तदाब तपासणी यासारख्या उपक्रमांच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांना आरोग्याविषयी सजग करण्याचा प्रयत्न या पदयात्रेच्या आणि मेळाव्याच्या आयोजनातून करण्यात आला.
या मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी यशोदा शिक्षण प्रसारक मंडळाचे कुलसचिव गणेश सुरवसे व डिप्लोमा फार्मसी विभाग प्रमुख आशिष थोरात, म्हसवे गावचे सरपंच मनीषा दीक्षित, उपसरपंच रमेश शेलार, ग्रामपंचायत सदस्य, सचिन शेलार, माजी सरपंच, शंकर शेलार यांच्यासह डिप्लोमा फार्मसी विभागातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या कडून गावच्या नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या मेळाव्यातील सुविधांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. दिवसभरामध्ये नागरिकांचे रक्तगट तपासणी, रक्तदाबाची तपासणी करणे ही कामे डिप्लोमा फार्मसी विभागातील विद्यार्थ्यांनी मन लावून पार पाडली. त्यानंतर गावातून काढलेल्या जनजागृती पदयात्रेतून निरोगी आयुष्याचा संदेश देण्यात आला. या उपक्रमासाठी यशोदा इन्स्टिट्यूट चे उपाध्यक्ष प्राध्यापक अजिंक्य सगरे, संचालक डॉ. विवेककुमार रेदासनी यांनी यांनी शुभेच्छा दिल्या.
म्हसवे येथे आयोजित करण्यात आलेल्या जनजागृती पद यात्रेचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला