वाई शेती उत्पन्न बाजार समिती नवीन हळद आवक सुरू उंच्चाकी दर रू.१६१००/- वाई तालुक्यातील पांडवगडावर गिर्यारोहकांवर मधमाशांच्या हल्ल्यात दोघे जण गंभीर जखमी महाराष्ट्र राज्याचे लाङके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा वाढदिवस मोठ्या ऊत्साहात साजरा सरदार वल्लभाई हायस्कूल साखरवाडी या शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा शालेय जीवनातील मैत्रीला 23 वर्षानंतर उजाळा ९०वां व्यवसाय प्रारंभ-दिनाच्या निमित्ताने बँक ऑफ महाराष्ट्र व उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा परिषद सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने बचत गटांचा महाकर्ज मेळावा पाचवड येथे संपन्न सायबर गुन्ह्यांना आधुनिक तंत्रज्ञानाने उत्तर द्यावे लागेल’-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ऑटोमोबाईल » यशोदा इन्स्टिट्यूटच्या पॉलिटेक्निक ला एम.एस.बी.टी.ई कडुन ‘ व्हेरी गुड’ ग्रेड प्रदान

यशोदा इन्स्टिट्यूटच्या पॉलिटेक्निक ला एम.एस.बी.टी.ई कडुन ‘ व्हेरी गुड’ ग्रेड प्रदान 

यशोदा इन्स्टिट्यूटच्या पॉलिटेक्निक ला एम.एस.बी.टी.ई कडुन ‘ व्हेरी गुड’ ग्रेड प्रदान 

तंत्रशिक्षणातील दर्जात्मक कामगिरी पुनश्च एकदा सिद्ध

यशोदा टेक्निकल कॅम्पस च्या फॅकल्टी पॉलिटेक्निक विभागास, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई मार्फत नेमण्यात आलेल्या एक्स्टर्नल इन्स्टिट्यूट मॉनिटरिंग कमिटी कडून ‘व्हेरी गुड’ ग्रेड प्रदान करण्यात आली. शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी परीक्षण करण्यात आले होते. 

महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई मार्फत डिप्लोमा अभ्यासक्रम शिकवणारे शैक्षणिक संस्थांचे समितीकडून परीक्षण करण्यात येते. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाबरोबरच व्यावसायिक आणि तंत्र शिक्षणासाठी आवश्यक असणार्या शैक्षणिक संसाधनांची उपलब्धता आणि त्याची व्यापकता या प्रमुख धर्तीवर हा परीक्षण कार्यक्रम राबविला जातो. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग, कंप्यूटर इंजीनियरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, त्याचबरोबर मेकॅनिकल इंजीनियरिंग, इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग, सिव्हिल इंजीनियरिंग या विद्याशाखांमध्ये परीक्षण करण्यात आले होते. 

बाह्य परीक्षण समिती म्हणजेच एक्स्टर्नल मॉनिटरिंग कमिटी मार्फत हे परीक्षण केले जात असल्यामुळे शैक्षणिक संस्था त्याकडे आव्हान आणि संधी या दुहेरी नजरेतून पाहतात. शैक्षणिक साधनांची उपलब्धता, ग्रंथालयातील संदर्भग्रंथांची उपलब्धता, विद्यार्थ्यांकडून या संदर्भग्रंथांची केले जाणारे वाचन आणि त्याची वारंवारता, संगणक प्रयोगशाळा तसेच संगणक प्रणालीचा वापर, प्रयोगशाळा सुसज्ज रूप आणि त्यातील साधनांची उपलब्धता, दरवर्षी होणारे प्रवेश आणि महाविद्यालय असणारी प्रवेशासाठीची विद्यार्थ्यांची पसंती, मुलामुलींसाठी उपलब्ध असणारे वसतिगृह तेथील स्वच्छता आणि सुरक्षितता, शैक्षणिक वर्गातील विद्यार्थ्यांचे निकालाची टक्केवारी, शिक्षकांकडून केले जाणारे शोध निबंध, शिक्षकांमार्फत केले जाणारे तज्ञ चर्चासत्रातील योगदान, सामाजिक जाणीवेचा भावनेतून राबवले जाणारे समाजाभिमुख उपक्रम, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील सामंजस्य करार या आणि अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा यामध्ये समावेश होतो.

यशोदा शिक्षण संस्थेतील विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धती आणि व्यवस्थापनाचा उत्तम शिक्षणासाठी चा कटाक्ष यामुळे हे यश मिळवणे शक्य झाल्याचे मत पॉलिटेक्निक कॉलेजचे चे प्राचार्य प्रवीण गावडे यांनी व्यक्त केले. पॉलिटेक्निक विभागाच्या यशाबद्दल संस्थापक अध्यक्ष प्रा.दशरथ सगरे, उपाध्यक्ष प्रा.अजिंक्य सगरे, संचालक, कुलसचिव, प्राचार्य यांनी सर्व शिक्षक वर्गाचे अभिनंदन केले. शिक्षकांनी या बाह्य परीक्षणासाठी विशेष तयारी करून हे यश संपादन केले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

९०वां व्यवसाय प्रारंभ-दिनाच्या निमित्ताने बँक ऑफ महाराष्ट्र व उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा परिषद सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने बचत गटांचा महाकर्ज मेळावा पाचवड येथे संपन्न

Live Cricket