Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ऑटोमोबाईल » विकासभिमुख, बहुआयामी व्यक्तिमत्व आ.तानाजीराव सावंत यांचा यशोदा इन्स्टिट्यूट तर्फे सत्कार

विकासभिमुख, बहुआयामी व्यक्तिमत्व आ.तानाजीराव सावंत यांचा यशोदा इन्स्टिट्यूट तर्फे सत्कार

विकासभिमुख, बहुआयामी व्यक्तिमत्व आ.तानाजीराव सावंत यांचा यशोदा इन्स्टिट्यूट तर्फे सत्कार

यशोदा इन्स्टिट्यूट चे संस्थापक अध्यक्ष प्रा. दशरथ सगरे, यांनी मुक्त कंठानी केले कौतुक

सोलापूर जिल्ह्यातील शिवजलक्रांती चे प्रणेते, दुष्काळी जिल्हा अशी ओळख पुसणारे, जिल्ह्याचे मागासलेपण दूर करणारे, मराठवाड्याच्या विकासाला समर्थ साथ आणि चालना देणारे, बहुआयामी, निडर, कार्य तत्पर, सर्व समावेशक, धडाकेबाज तानाजीराव सावंत यांनी पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकांमध्ये भूम परांडा या विधासभा मतदारसंघातून विजय संपादन करून विधिमंडळामध्ये आपले स्थान निश्चित केल्याबद्दल यशोदा इन्स्टिट्यूट तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. 

यावेळी तानाजी सावंत यांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीचे यशोदा इन्स्टिट्यूट चे संस्थापक अध्यक्ष प्रा. दशरथ सगरे यांनी मुक्त कंठानी कौतुक केले.

तानाजी सावंत हे सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील वाकाव येथील, शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या तानाजीराव सावंत यांनी शिक्षण क्षेत्रासह, राजकारण आणि कारखानदारीत आपली कारकीर्द सिद्ध केली आहे. कार्यक्षेत्र म्हणून पुण्याची निवड करत जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यात सोनारी येथे भैरवनाथ शुगर या खासगी साखर कारखान्याची उभारणी करीत त्यांनी साखर उद्योगात पाऊल ठेवले. क्षेत्र कोणतेही असो आपले प्रचंड निर्णय क्षमतेने आणि कामाच्या प्रचंड व्यासंगामुळे वेगळी छाप पडणारे असे ते व्यक्तिमत्त्व आहे. महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री म्हणून काम करत असताना त्यांचीही परखड ओळख पुन्हा पुन्हा सिद्ध होताना दिसते. राजकारण समाजकारण शिक्षण सहकार अशा विविध अंगी कार्यक्षेत्रामध्ये ते एकाच तत्परतेने काम करताना दिसतात. 

 यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ, यशोदा शिक्षण संस्था परिवाराशी प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांचे एक वेगळे, विशेष नातं आहे.ज्या पद्धतीने तानाजीराव सावंत यांनी जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ च्या माध्यमातून पुण्यासारख्या शहरात जी शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखली जाते, त्यांनी जे अफाट काम करून आणले आहे त्याच प्रेरणेने यशोदा शिक्षण संस्थेची स्थापना झाली आहे. 

 

शिवजलक्रांतीच्या रूपाने त्यांनी दुष्काळावर मात मिळवण्यासाठी केलेले कार्य हे संबंध शेतकरी वर्गाला सुखावणारे आणि जन माणसाच्या मनाला अल्हाद देणारे असे आहे. सर्वसाधारणपणे व्यावसायिक क्षेत्रामध्ये एक विशिष्ट उंची गाठल्यानंतर समाजसेवा प्रति असणारी ओढ कमी होते, डॉ. सावंत याला अपवाद आहेत. व्यवसायिक क्षेत्रात अनन्य साधारण अशा प्रकारचे काम केल्यानंतर देखील त्यांनी समाजाप्रती असणारी आपली ओढ कधीही कमी होऊ दिली नाही उलट तितक्याच सकारात्मक त्यांनी पुढे येऊन राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण असं व्यापक दृष्टिकोन ठेवून काम केले आणि त्याचेच प्रत्यंतर म्हणून विधान भवनामध्ये दुसऱ्यांदा ते आमदार म्हणून आपली कारकीर्द पार पाडत आहेत.

 एक बहुआयामी व्यक्तिमत्व आपले व्यापक आणि सकारात्मक दृष्टिकोनातून समाजाची कशी उन्नती करू शकतो याचे समर्पक असे उदाहरण ते आहेत. राजकारणामध्ये देखील समविचारी अशा सर्व समावेशक नेतृत्वांना एकत्र घेऊन जाण्याचा त्यांचा मनसुबा नेहमी ठळकपणे समोर येतो.   

त्यांच्या या विजयी वाटचालीसाठी तसेच त्यांचे प्रगल्भ, व्यापक, सकारात्मक कार्य अशाच प्रकारे उत्तरोत्तर घडत राहो. त्यांच्या हातून समाज उन्नतीची अधिकाधिक कार्य घडावे. महान असणाऱ्या महाराष्ट्राचे नाव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकत राहण्यासाठी त्यांच्या कार्यालI यशोदा इन्स्टिट्यूट कडून शुभेच्छा.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे जल्लोषात उद्घाटन

Post Views: 8 गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे जल्लोषात उद्घाटन महाबळेश्वर : गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक

Live Cricket