Home » Uncategorized » वाई तालुका राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ओबीसी संघटना वाई तालुकाध्यक्षपदी उद्योजक अरविंद काका कुदळे

वाई तालुका राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ओबीसी संघटना वाई तालुकाध्यक्षपदी उद्योजक अरविंद काका कुदळे

वाई तालुका राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ओबीसी संघटना वाई तालुकाध्यक्षपदी उद्योजक अरविंद काका कुदळे यांची निवड करण्यात आली.   

    यावेळी बोलताना आ.मकरंद पाटील म्हणाले,अरविंद काकांनी मोठ्या कष्टाने उद्योजक म्हणून आपला नावलौकिक वाढविला आहे.सामाजिक कार्यातही काकांचा मोठा वावर होता,सढळ हाताने त्यांनी लोकांना मदत केली आहे.स्व.लक्ष्मणराव पाटील यांचे घनिष्ठ मित्र सहकर अशीच काकांची आजवरची ओळख आहे.त्यांनी कधीही कोणत्याही पदाची अपेक्षा केली नव्हती.ओबीसी तालुकाध्यक्ष या पदामुळे काकांना लोकांना अधिकच वेळ देता येईल, त्यांच्या समाजकार्यात यामुळे व्यापकता येईल.

  अरविंद कुदळे म्हणाले,सर्वांना बरोबर घेऊन जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करू.या पदामूळे मला आणखी वेगाने काम करता येईल.मकरंद आबांना मोठे मताधिक्य देणे हेच आमच्या संघटनेचे ध्येय असेल.

  या निवडीबद्दल काकांचे खा.नितीन पाटील,कारखाना उपाध्यक्ष प्रमोद शिंदे,संचालक दत्तानाना ढमाळ,दिलीपराव पिसाळ,लक्ष्मणराव पिसाळ शहाजी पिसाळ, संतोष पिसाळ,संजय पिसाळ,बाळासाहेब कुदळे,नितीन पिसाळ,संदीप ढवळे, दादासो पिसाळ, शंकरराव फरांदे,किसन नेवसे,सरपंच सौ मनीषा फरांदे व माजी सरपंच सौ स्वाती कुदळे यांच्यासह ग्रामस्थानी अभिनंदन केले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

काव्य संग्रह “दोन शब्द दोन गोष्टी “”पुस्तक प्रकाशनासह स्नेह मेळावा संपन्न

Post Views: 80 राजेंद्र विद्यालय खंडाळा येथील 1976-77 च्या माजी विदयार्थ्यांनी काव्य संग्रह “दोन शब्द दोन गोष्टी “”पुस्तक प्रकाशनाने केला

Live Cricket