वाई शेती उत्पन्न बाजार समिती नवीन हळद आवक सुरू उंच्चाकी दर रू.१६१००/- वाई तालुक्यातील पांडवगडावर गिर्यारोहकांवर मधमाशांच्या हल्ल्यात दोघे जण गंभीर जखमी महाराष्ट्र राज्याचे लाङके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा वाढदिवस मोठ्या ऊत्साहात साजरा सरदार वल्लभाई हायस्कूल साखरवाडी या शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा शालेय जीवनातील मैत्रीला 23 वर्षानंतर उजाळा ९०वां व्यवसाय प्रारंभ-दिनाच्या निमित्ताने बँक ऑफ महाराष्ट्र व उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा परिषद सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने बचत गटांचा महाकर्ज मेळावा पाचवड येथे संपन्न सायबर गुन्ह्यांना आधुनिक तंत्रज्ञानाने उत्तर द्यावे लागेल’-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » वाई नगरपालिकेकडून सहा दुकाने सील

वाई नगरपालिकेकडून सहा दुकाने सील

वाई नगरपालिकेकडून सहा दुकाने सील

वाई प्रतिनिधी (शुभम कोदे)वाई नगरपालिकेने कर वसुलीसाठी आता कडक पावले उचलली असून वसुलीची धडक मोहीम हाती घेतली आहे. आज गुरुवार दि. 23 रोजी नगरपरिषद मालकीचे विविध शॉपिंग सेंटर मधील सहा व्यापारी गाळे भाडे व घरपट्टी थकित असल्यामुळे सील करण्यात आले. तसेच यापुढे थकबाकीदारांना कर न भरल्यास वसुलीची मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे. दरम्यान जप्तीची कारवाई टाळण्यासाठी नागरिकांना वेळेत कर भरणा करण्याचे आवाहन मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांनी केले आहे. 

   वाई नगर परिषदेने सन 2024- 25 या आर्थिक वर्षात थकीत तसेच चालू घरपट्टी, पाणीपट्टी व गाळाभाडे यांच्या वसुलीसाठी धडक मोहीम हाती घेतली असून शहरात वसुली पथक व जप्ती पथक द्वारे कारवाई सुरू केली आहे. नगर परिषदेच्या जप्ती पथकाने आत्तापर्यंत सहा दुकान गाळ्यांची थकबाकी सुमारे दहा लाखापेक्षा जास्त असल्याने ते सील केले असून व 22 घरगुती नळ कनेक्शन धारकांचा पाणीपुरवठा खंडित केला आहे.  

जे मालमत्तेधारक मुदतीत कर भरणा करणार नाहीत अशा मालमत्तांवर महाराष्ट्र नगरपरिषद नगरपंचायती औद्योगिक नागरी अधिनियम 1965 मधील तरतुदीनुसार मालमत्ता सील करणे, मालमत्ता जप्त करणे, पाणीपुरवठा खंडित करणे, मलमत्तांसमोर हलगी वाजविणे, थकबाकीदारांच्या नावांची यादी चौकाचौकांत फ्लेक्सद्वारे लावणे तसेच संबंधित मालमत्तांवर बोजा चढविण्यासाठी मा.जिल्हाधिकारी सो सातारा यांना प्रस्तावित करणे आदी मार्गांचा अवलंब करण्यात येणार आहे. मालमत्ता कर, गाळाभाडे तसेच पाणीपट्टी हे नगरपरिषदेच्या महसुली उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत असून या माध्यमातून आलेल्या निधीतूनच विविध विकास कामे मार्गी लावली जातात. त्यामुळे नागरिकांनी वेळीच कर भरून नगरपरिषद प्रशासनास सहकार्य करावे.

       तसेच सर्व मिळकत धारकांनी आपली घरपट्टी, पाणीपट्टी व गाळा भाड्याची रक्कम तात्काळ नगरपरिषद कार्यालयात भरणा करून कारवाई टाळावी व नगरपरिषदेस सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांनी केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

९०वां व्यवसाय प्रारंभ-दिनाच्या निमित्ताने बँक ऑफ महाराष्ट्र व उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा परिषद सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने बचत गटांचा महाकर्ज मेळावा पाचवड येथे संपन्न

Live Cricket