Home » ठळक बातम्या » वाई विधानसभा मतदार संघात ६०.७८ टक्के मतदान मतदारांचे निकालाकडे लागले डोळे

वाई विधानसभा मतदार संघात ६०.७८ टक्के मतदान मतदारांचे निकालाकडे लागले डोळे

वाई विधानसभा मतदार संघात ६०.७८ टक्के मतदान .मतदारांचे निकालाकडे लागले डोळे

वाई प्रतिनिधी –सातारा लोकसभेच्या निवडणुकीसाठी वाई, खंडाळा, महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघात आज एकूण अंदाजे ६०.७८ टक्के मतदान झाले. दुर्गम कांदाटी खोर्‍यातही निर्विघ्नपणे मतदान प्रक्रिया पार पडली. किरकोळ वादावादीचे प्रकार वगळता सर्वत्र मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडली. रात्री उशिरापर्यंत ईव्हीएम व व्ही. व्ही. पॅट मशीन घेऊन पोलीस बंदोबस्तात वाई मध्ये आणली जात होती.

खा. श्री. छ. उदयनराजे भोसले व शशिकांत शिंदे यांच्यासह चौदा उमेदवारांचे भविष्य आज पेटीबंद झाले. आज सकाळी ७ वाजता मतदार संघातील ४५४ मतदान केंद्रावर २१०० कर्मचार्‍यांच्या माध्यमातून मतदान प्रक्रिया सुरू झाली.

प्रखर उन्हामुळे सकाळच्या व सायंकाळच्या वेळात मतदान केंद्रावर गर्दी झालेली पाहायला मिळत होती. दुपारच्या रखरखीत उंन्हात अनेक मतदारांनी मतदान केंद्रावर जाण्यास नापसंती दाखवली. शहरातील बहुतेक केंद्रांवर ६ ची वेळ संपल्या नंतरही मतदाना साठी रांगा लागलेल्या होत्या.

सकाळी ११ वाजेपर्यंत मतदारांचा ओघ मतदान केंद्रावर दिसत होता. अनेक ठिकाणी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दुपारी १ वाजे पर्यंत ३१.२९ टक्के मतदान झाले होते. दुपारी १२ ते ३ पर्यंत मतदारांचा ओघ कमी झाला होता. दुपारी ४ नंतर मात्र पुन्हा मतदान केंद्रावर रांगा लागल्या होत्या. काही ठिकाणी ईव्हीएम मशीन स्लो सुरु असल्याने मतदान संथगतीने सुरु होते.

जेष्ठ नागरिकांसह दिव्यांग मतदारांनी आपला मतदानाचा हक्क आज बजावला. दिव्यांग मतदारांसाठी स्वतंत्र वाहन व व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली होती. दुर्गम कांदाटी खोर्‍यातील सर्वच्या सर्व मतदान केंद्रावर आज निर्विघ्नपणे मतदान प्रक्रिया पार पडली. याठिकाणची वायरलेस व जीपीएस यंत्रणा सुरळीत असल्याने मतदान प्रक्रियेची माहिती सहजपणे सहाय्यक निवडणूक अधिकारी राजेंद्र जाधव यांच्याकडे उपलब्ध होत होती.

सकाळी ७ वाजल्यापासून मतदानास प्रारंभ झाला. सकाळी ११ वाजेपर्यंत १७.४९ टक्के मतदान झाले. सुमारे ५६ हजार ७६५ मतदारांनी मतदान केले. दुपारी १ वाजेपर्यंत ३१.२९ टक्के मतदान झाले. सुमारे १ लाख ६९२२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दुपारी ३ वाजेपर्यंत ४१.८६ टक्के मतदान झाले. सुमारे १ लाख ४३ हजार ४१ मतदारांनी मतदान केले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५१.९३ टक्के मतदान झाले. सुमारे १ लाख ७७ हजार ४५२ मतदारांनी मतदान केले. सायंकाळी 6 वाजेपर्यंत जे मतदार मतदान केंद्रात उपस्थित होते. त्यांचे मतदान उशीरापर्यंत सुरू असल्याने नक्की आकडेवारी समजू शकली नाही. तरी अंदाजे ६०.७८ टक्के मतदान झाले असण्याची शक्यता आहे.

वृध्द, दिव्यांग व्यक्तींसाठी मतदान केंद्रापर्यंत नेण्या आणण्याची सोय करण्यात आली होती. अनेक वृध्दांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्या कामी सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, अतिरिक्त सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी तथा वाईचे तहसिलदार सोनाली मेटकरी , महाबळेश्‍वरच्या तहसिलदार श्रीमती तेजस्विनी खोचरे-पाटील, खंडाळाचे तहसिलदार अजित पाटील व वाई विधानसभा मतदार संघात मतदान प्रक्रिये साठी प्रत्येक बुथवर नेमण्यात आलेले सर्व अधिकारी कर्मचारी पोलिस कर्मचारी या सर्वांनी व त्यांच्या इतर सहकार्‍यांनी विशेष परिश्रम घेतले.

पोलीस उपअधिक्षक बाळासाहेब भालचीम यांच्या मार्गदर्शना खाली तीन्ही तालुक्यां मध्ये मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. वाईचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, भुईज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक रमेश गर्जे वाईचे सपोनि वैभव पवार वाई डिबीचे प्रमुख पोलिस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज पोलिस ऊपनिरिक्षक बिपीन चव्हाण भुईंजचे पिएसआय अवघडे यांनी वाई शहर व तालुक्यातील मतदान केंद्रांना भेटी देवून मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवून होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कर्तुत्व व जनाधार असल्याने आ.श्रीमंत छ. शिवेद्रसिंहराजेंना मंत्रिपद निश्चित मिळेल – आमदार योगेश टिळेकर

कर्तुत्व व जनाधार असल्याने आ.श्रीमंत छ. शिवेद्रसिंहराजेंना मंत्रिपद निश्चित मिळेल – आमदार योगेश टिळेकर भुईंज (महेंद्रआबा जाधवराव )-हिंदू बहुजन सन्मान

Live Cricket