Home » राज्य » किसन वीर’ने अडचणींवर मात करून मिळविला टॉप टॅक्स पेअरचा बहुमान

किसन वीर’ने अडचणींवर मात करून मिळविला टॉप टॅक्स पेअरचा बहुमान

किसन वीर’ने अडचणींवर मात करून मिळविला टॉप टॅक्स पेअरचा बहुमान

दि. १/७/ २०२५ : सातारा जिल्ह्यातील सहकारी चळवळीचा एक महत्वाचा स्तंभ म्हणजे भुईज येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना. आर्थिक संकटे, बदलते हवामान, उसाचे घसरते उत्पादन आणि वाढती स्पर्धा या सर्व अडचणींवर मात करून किसन वीर कारखान्याने मागील तीन वर्षामध्ये नव्या स्वरूपात व भुमिकेत आपला ठसा उमठवला आहे. किसन वीर साखर कारखान्याला आज महाराष्ट्र सरकारकडून वस्तु व सेवाकर विभागामार्फत सातारा जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त जीएसटी भरणा केल्यामुळे टॉप टॅक्स पेअर (Top Tax Payer) हा पुरस्कार मिळाला आहे.

या पुरस्कारामुळे किसन वीर कारखान्यावरील पारदर्शक कारभाराचा आणि आर्थिक शिस्तीचा मोठा सन्मान असल्याची भावना कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी व्यक्त केली.श्री.शिंदे पुढे म्हणाले की, काही वर्षापूवी किसन वीर साखर कारखाना आर्थिकदृष्या अडचणीत सापडला होता. उसाचा तुटवडा, कामगारांचे प्रश्न, वीज दरवाढ, आणि कर्जबाजारीपणा गैरवस्थापन यामुळे कारखान्याची गळचेपी झालेली होती. शेतकऱ्यांची अर्थवाहिनी असलेली संस्था अडचणीत असताना ती सभासद व कामगाराच्या हिताकरिता ताब्यात घेऊन महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंदआबा पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन खासदार नितीनकाका पाटील व व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने संस्थेच्या बाबतीत कठोर निर्णय घेत, व्यवस्थापनात आमूलाग्र सुधारणा केल्या आणि एक स्पष्ट, भविष्यमुख आराखडा तयार केलेला असून त्यामार्गावरून मार्गक्रमण करीत असताना हार मानली नाहीं. कारखान्याने आपल्या युनिटमध्ये तांत्रिक सुधारणा केल्या. कारखान्याकडील अस्तित्वात असणारे सर्व प्रकल्प पर्यावरणपूरक वीज निर्मिती प्रकल्प, आसवनी प्रकल्प आणि इथेनॉल प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालविले . शेतकऱ्यांशी थेट संवाद ठेवत त्यांना वेळेवर एफआरपीचे रक्कम वेळेवर देऊन कारखान्यावरील विश्वास परत मिळविला.

आर्थिक शिस्त पाळत, शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून नियमितपणे जीएसटी, इन्कम टॅक्स आणि इतर कर भरण्यावर भर देऊन शासकीय पातळीवरही नावलौकिक मिळविले असुन हा पुरस्कार म्हणजे त्याचाच परिपाक असल्याचे मत यावेळी श्री. शिंदे यांनी व्यक्त केले.किसन वीर कारखान्यास टॉप टॅक्स पेअरचा पुरस्कार मिळाल्याबहल महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार व कारखान्याचे चेअरमन मकरंदआबा पाटील, खासदार नितीनकाका पाटील, व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे व संचालक मंडळ यांनी कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

हा पुरस्कार शेतकरी सभासद व कर्मचाऱ्यांनी टाकलेल्या विश्वासाचे प्रतिक- खासदार नितीनकाका पाटील

या सर्व प्रयत्नांचे फलित म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या कर विभागाकडून टॉप टॅक्स पेअर या सन्मानाने गौरवले जाणे. हा पुरस्कार केवळ आर्थिकदृष्ट्या सक्षम असण्याचे प्रतीक नाही, तर पारदर्शकता, जबाबदारी आणि देशहितासाठी प्रामाणिकपणे योगदान देण्याची जाणीव दर्शवतो. हा पुरस्कार केवळ किसन वीर कारखान्याचा नाही, तर संपूर्ण सहकारी चळवळीचा, शेतकरी, कर्मचाऱ्यांचा आणि कारखान्याशी जोडलेल्या सर्व घटकांचा सन्मान असुन आता खऱ्या अर्थाने किसन वीरची प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली असून शेतकरी सभासद व कर्मचाऱ्यांनी आमच्यावर टाकलेल्या विश्वासाचे प्रतिक असल्याचे मत जिल्हा बँकेचे चेअरमन तथा कारखान्याचे मार्गदर्शक संचालक खासदार नितीनकाका पाटील यांनी व्यक्त केले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महाबळेश्वर हॉटेल चोरीप्रकरणी आरोपी मुंबई विमानतळावर जेरबंद; ९.९० लाखांचा मुद्देमाल जप्त

Post Views: 248 महाबळेश्वर हॉटेल चोरीप्रकरणी आरोपी मुंबई विमानतळावर जेरबंद; ९.९० लाखांचा मुद्देमाल जप्त महाबळेश्वर: महाबळेश्वर येथील हॉटेल ऑक्सिजनमध्ये २५

Live Cricket