कराड पाटण फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने जागतिक छायाचित्र दिन साजरा
कराड- प्रतिनिधी: कराड पाटण फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने जागतिक छायाचित्र दिनाचे औचित्य साधून कराड येथे फोटोग्राफर स्नेह मेळावा आणि व्यवसाय वृद्धी मार्गदर्शन सोहळा चे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी अध्यक्ष विजय शिंदे उपाध्यक्ष माधव चव्हाण बापू सचिव हणमंत पाटील असोसिएशनचे संस्थापक सुरेश पवार जागतिक छायाचित्र दिन 19 ऑगस्ट 2024 च्या संयोजन समितीचे सर्व सदस्य आणि मान्यवर फोटोग्राफर सभासद बंधूंच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन सरस्वती पूजन आणि कॅमेऱ्याच्या प्रतिमेचे पूजन त्यानंतर संस्थेच्या चालू वर्षातील दिवंगत फोटोग्राफर सदस्यांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाची सुरुवात झाली सुरुवातीला असोसिएशनचे उपाध्यक्ष माधव चव्हाण बापू यांनी प्रास्ताविक केले यामध्ये असोसिएशनच्या स्थापनेपासून आज अखेर असोसिएशनच्या वतीने फोटोग्राफर बंधूंच्यासाठी केलेल्या सर्व उपक्रमांची माहिती यावेळी दिली तसेच सर्व उपस्थित फोटोग्राफर याचे स्वागत केले त्यानंतर अध्यक्ष भाषण असोसिएशनचे अध्यक्ष विजय शिंदे यांनी सर्वांचे स्वागत केले याप्रसंगी कलबुर्गी लॅबचे अवधूत कुलबुर्गी, विनीज लॅबचे जुबेर मोकाशी,आदित्य लॅब चे विजय थोरात, हॉलिवूडचे पारेकर बंधू नटराज ॲक्सेस ची ऋषिकेश पाटील, सत्यम लॅब चे रोहित शिंदे रूपाली फोटो मटेरियल शॉपी चे सुयोग सगरे तसेच नामांकित फोटोग्राफर जेष्ठ फोटोग्राफर राजेंद्र शिंदे, संजय गुंडाळे, तसेच पाटणचे पवार आणि कराड आणि पाटण तालुक्यातील असोसिएशनचे सर्व संचालक तसेच असोसिएशनचे सभासद फोटोग्राफर बहुसंख्येने उपस्थित होते यावेळी या स्नेह मिळाल्या करता कराडचे प्रसिद्ध फोटोग्राफर उदय देसाई यांचे व्यवसाय वृद्धी या विषयावरती मार्गदर्शन लाभलं यामध्ये आजच्या डिजिटल युगाच्या अनुषंगाने व्यवसायामध्ये येणाऱ्या नवीन नवीन बदलाविषयी देसाई यांनी उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले समारोपामध्ये कराड मधील महिला फोटोग्राफर यांचेही यावेळी नारी सन्मान करण्यात आला, यानंतर असोसिएशनच्या स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त आणि जागतिक छायाचित्र दिनाच्या निमित्ताने उपस्थितांच्या हस्ते केक कापण्यात आला . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबा काळोखे यांनी केलं प्रास्ताविक उपाध्यक्ष माधव चव्हाण बापू यांनी केले ,अध्यक्षीय भाषण अध्यक्ष विजय शिंदे यांनी केलं आणि कार्यक्रमाचे आभार सदाशिव खटावकर यांनी करून कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी असोसिएशनच्या सर्व फोटोग्राफर सभासदांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आली, तसेच पुढील असोसिएशनच्या उपक्रमांची माहिती यावेळी देण्यात येऊन अल्पोपराने या कार्यक्रमाची सांगता झाली सुमारे 250 फोटोग्राफर सभासद बंधूनी सदर कार्यक्रमाला आपली उपस्थिती देऊन हा जागतिक छायाचित्र दिन मोठ्या उत्साहाने आनंदाने साजरा करण्यात आला.