वाई पंचायत समिती कर्मचाऱ्यांच्या मुलांचा गुणगौरव सोहळा संपन्न
वाई प्रतिनिधी (शुभम कोदे)मुलांनी दहावीनंतर विविध क्षेत्रांमध्ये संधी उपलब्ध आहेत त्या आवडीनुसार योग्य त्या शाखेमध्ये प्रवेश घेऊन आपली पुढील वाटचाल यशस्वी करावी असे मत वाई पंचायत समिती गट विकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी व्यक्त केले.
वाई पंचायत समिती सभागृहात कर्मचाऱ्यांच्या मुलांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते याप्रसंगी उपअभियंता संजय जाधव आरोग्य अधिकारी गायकवाड शिक्षण अधिकारी पाणीपुरवठा अधिकारी शाखा अभियंता संजीव शिंदे विस्ताराधिकारी राठोड, संजय पिसाळ श्रीमती शोभा पिसाळ मॅडम साळुंखे व पंचायत समिती सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
याप्रसंगी कुमारी अक्षरा शिंदे हिला दहावी परीक्षेत 96.60% चिरंजीव श्रीराम पिसाळ 83.40% कुमारी प्रांजल राठोड 94.40% अशा अनेक निर्मल कॉन्व्हेंट हायस्कूल सातारा वाई येथील विद्यालय शिकणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांच्या मुलांचा गट विकास अधिकारी विजयकुमार परीट यांच्या हस्ते या मुलांचा सत्कार करण्यात आला.
