Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » बुधवार दिनांक ७ ऑगस्ट २०२४ रोजीचा साखर कामगारांच्या इशारा मोर्चा

बुधवार दिनांक ७ ऑगस्ट २०२४ रोजीचा साखर कामगारांच्या इशारा मोर्चा

बुधवार दिनांक ७ ऑगस्ट २०२४ रोजीचा साखर कामगारांच्या इशारा मोर्चा

साखर कामगारांवर अन्याय करुन गुलामगिरी करणेस भाग पाडणाऱ्या शासनास व साखर कारखानदारांना धडा शिकविणेसाठी तसेच कामगारांच्या हक्काच्या मागण्यासाठी बुधवार दिनांक ७ ऑगस्ट २०२४ रोजीचा साखर कामगारांच्या इशारा मोर्चात सातारा जिल्ह्यातील साखर कामगारांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांनी केले आहे.

भुईंज – (महेंद्रआबा जाधवराव) महाराष्ट्रातील साखर कामगार व जोडधंद्यातील कामगार यांच्या वेतनवाढीच्या त्रिपक्षीय कमिटीच्या कराराची मुदत ३१ मार्च २०२४ रोजी संपलेली आहे. पगार वाढीसाठी व नवीन कमिटी गठीत करणेबाबत महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाने जा. क्र. ०९/२०२४ दि. १० फेब्रुवारी २०२४ रोजीचे पत्राने बदलाच्या नोटीशीने कराराची मुदत संपल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील , कामगारमंत्री सुरेश खाडे , साखर संघाचे अध्यक्ष श्री. पी. आर. पाटील तसेच कार्यकारी संचालक साखर संघ, मुंबई, कामगार आयुक्त व साखर आयुक्त यांना कळविले व जा. क्र. ०९/२०२४ दि. २७ फेब्रुवारी २०२४ च्या पत्राने नवीन मागण्याचा मसुदाही संबंधितांना पाठविला असल्याचे सांगून तात्यासाहेब काळे पुढे म्हणाले,

६ महिने झाले तरी सुध्दा पगारवाढीबाबत काहीही निर्णय झालेला नाही. त्यामुळे साखर व जोडधंद्यात काम करणाऱ्या कामगारांत असंतोष निर्माण झालेला असून साखर कामगारांच्या प्रश्नाबाबत महाराष्ट्र सरकार व साखर संघ गांभीर्याने पाहत नाही याबाबत त्यांची उदासिनतेची भुमिका असल्याचे दिसून येते.

त्यामुळे या साखर कामगारांच्या महत्वाच्या प्रश्नाकडे शासनाचे व साखर संघाचे लक्ष वेधनेसाठी बुधवार, दि. ७ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता साखर आयुक्तालयावर इशारा मोर्चाचे आयोजन केले आहे. तरी आपण मोठ्या संख्येने या इशारा मोर्चास उपस्थित राहून हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी 

श्रमिक भवनासमोर, पुणे महानगरपालिकेजवळ, शिवाजीनगर, पुणे ०५ येथे एकत्र जमावे.

मोर्चातील प्रमुख मागण्या

साखर व जोडधंद्यातील कामगारांना सत्वर पगारवाढ देण्याचा निर्णय करण्यात यावा, साखर व जोडधंद्यातील कामगारांना वेतन व सेवा शर्ती ठरविणेबाबत लवकरात लवकर शासनाने त्रिपक्षीय कमिटी गठित करावी, साखर उद्योगातील रोजंदारी, कंत्राटी, नैमित्तिक व तात्पुरती काम करणाऱ्या कामगारांनाही अकुशल कामगारांच्या वेतनाप्रमाणे मागील करारातील तरतुदीनुसार वेतन मिळालेच पाहिजे, साखर उद्योगातील कामगारांचे थकीत वेतन मिळणेसाठी शासनाने वेगळा निधी उभा करावा व थकीत वेतन मिळवून द्यावे, खाजगी साखर कारखान्यातील कामगारांना वेतन मंडळाच्या पगार वाढीच्या करारानुसार वेतन मिळालेच पाहिजे. तसेच बंद पडलेल्या साखर कारखान्यातील कामगारांचे प्रलंबित प्रश्न सुटले पाहिजेत व शासनाने योग्य त्या ठिकाणी त्यांचे पुर्नवसन करावे, साखर उद्योगातील सेवानिवृत्त कामगारांना रू. ९,०००/- पेन्शन मिळालीच पाहिजे, शेती महामंडळातील कामगारांचे प्रलंबित प्रश्न सुटलेच पाहिजेत.आदी प्रमुख मागण्या मिळविणेसाठी हजारोंच्या संख्येने मोर्चास उपस्थित राहून मोर्चा यशस्वी करावा, असेही अध्यक्ष तात्यासाहेब काळे, सरचिटणीस शंकरराव भोसले, सचिव सयाजीराव कदम (सातारा ) 

व सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

छत्रपती शिवाजी कॉलेजच्या उप प्राचार्यपदी प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांची नियुक्ती

Post Views: 13 छत्रपती शिवाजी कॉलेजच्या उप प्राचार्यपदी प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांची नियुक्ती सातारा: येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे घटक महाविद्यालय

Live Cricket