Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » आम्ही लाडक्या बहि‍णींना 2000 रुपये देणार; सांगलीत राहुल गांधींसमोरच खर्गेंची मोठी घोषणा

आम्ही लाडक्या बहि‍णींना 2000 रुपये देणार; सांगलीत राहुल गांधींसमोरच खर्गेंची मोठी घोषणा

आम्ही लाडक्या बहि‍णींना 2000 रुपये देणार; सांगलीत राहुल गांधींसमोरच खर्गेंची मोठी घोषणा

प्रतिनिधी – महाराष्ट्रात आमचं सरकार आल्यास लाडकी बहिण योजनेसाठी तुम्हाला 2 हजार रुपये देणार, तुम्ही तुमचा सन्मान मोदी यांच्यासमोर गहाण ठेवणार आहे का, ⁠मोदी सरकारने तोडण्या फोडण्याच्या पलिकडे काय केल ते सांगा, महाराष्ट्र जर जिंकला तर सारा देश जिंकेल आणि लवकरच भाजपच सरकार जाईल, असेही खर्गे यांनी म्हटले.मल्लिकार्जुन खर्गे हे सांगलीत दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमासाठी आले होते. 

यावेळी, राज्यातील लाडकी बहीण योजनेसंदर्भात बोलताना त्यांनी मोठी घोषणा केली आहे. या योजनेतील पात्र महिलांना 2000 रुपये देण्याचं त्यांनी जाहीर केलंय.

राज्यात महायुतीचे नेते योजनेच्या अनुषंगाने प्रचार व प्रसार सुरू आहे. सत्ताधारी या योजनेचा लाभ आपल्याला मिळावा म्हणून महिला भगिनींना आवाहन करताना दिसून येतात. तर, विरोधकांकडून ही योजना निवडणुकांच्या तोंडावर आणल्याचे सांगत सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं जातंय. तसेच, आमचं सरकार आल्यास ह्या योजनेच्या रकमेत अधिक वाढ करू, असे आश्वासनही दिलं जात आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

वाई लो.टिळक आयकर चर्चासत्र

Post Views: 10 वाई:- लो.टिळक आयकर चर्चासत्र वृत्त. वाई,ता.२५:- लोकहितासाठी काम करणाऱ्या सार्वजनिक ट्रस्ट अथवा संस्थानी आयकर कायद्यातील तरतुदीला अनुसरून

Live Cricket