मतदार जनजागृती अभियानात यशेंद्र क्षीरसागराचे कार्य मोलाचे – श्रीरंग काटेकर
लिंब – भारतीय लोकशाहीच्या बळकटीसाठी सामजिक दायत्वाची भूमिका घेवून सदैव कार्यरत असणारे व मतदान जनजागृती अभियान व नवमतदार नोंदणीसाठी भरीव कामगिरी करणारे कोरेगाव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी यगेंद्र क्षीरसागर यांच्या कार्याचा आम्हाला अभिमान वाटतो असे मत गौरीशंकरचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांनी व्यक्त केले ते लिंब ता. जि सातारा येथील गौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च लिंब महाविद्यालयात यशेंद्र क्षीरसागर यांनी सन 2024-25 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीत कोरेगाव मतदार संघात मतदान वाढीसाठी घेतलेल्या विशेष परिश्रमाबद्दल आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉं. योगेश गुरव ,डॉ. धैर्यशील घाडगे, प्रा रोहन खुटाळे प्रबंधक निलेश पाटील अदि प्रमुख उपस्थित होते.
यशेंद्र क्षीरसागर यांनी प्रशासकीय पातळीवर काम करताना सर्वसामान्य घटकापासून ते उच्च वर्गीय मध्ये मतदानाचे महत्त्व हे पटवून देऊन त्यांना मतदानासाठी प्रवृत्त केले त्यांच्याबरोबरच्या सहकाऱ्यांची ही त्यांना अनमोल साथ लाभली सर्वांच्या सहकार्याबरोबरच मतदान टक्का वाढीसाठी यशेंद्र क्षीरसागर यांनी केलेले अचूक योजना मुळे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रथमच कोरेगाव मतदार संघात सर्वाधिक 77.38% मतदान झाले त्यांच्या या कार्याचा आम्हाला अभिमान वाटतो.
प्राचार्य डॉ. योगेश गुरव म्हणाले की यशेंद्र क्षीरसागर यांच्या कार्यातून भविष्यात अनेक जण प्रेरणा घेऊन मतदान जनजागृती अभियानात प्रभावीपणे काम करतील अशी अपेक्षा आहे त्यांनी घालून दिलेला आदर्श भारतीय लोकशाहीच्या बळकटीच्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण ठरले आहे विस्तार अधिकारी म्हणून काम करताना यशेंद्र क्षीरसागर यांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून समाजाला नवी दिशा देण्याचे काम केले आहे
यशेंद्र क्षीरसागर म्हणाले की मतदार राजा जागा झाला तरच खऱ्या अर्थाने भारतीय लोकशाही अधिक प्रगल्भ होणार आहे आपणाला लोकशाही प्रणालीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेल्या मतदानाचा हक्क आपण बजावला पाहिजे मतदान करूया व नवराष्ट्र उभारूया हा संदेश आता प्रत्येक घराघरात पोचला पाहिजे या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार संजय देशमाने यांनी मानले.
अधिकारी कर्मचारी अंगणवाडी सेविका अशा सेविका शिक्षक नागरिक व मतदार यांच्याशी सातत्याने समन्वय साधून मतदान जनजागृतीसाठी या घटकांचा लोकसहभाग उंचाविण्यामध्ये यशेंद्र क्षीरसागराची मोलाची योगदान तसेच कोरेगाव विधानसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का उंचाविण्यासाठी विविध स्पर्धा जनजागृती रॅली व्याख्याने पटनाट्य या माध्यमातून केलेली जनजागृती व लोक सहभागाचा मिळालेल्या पाठबळावर मतदान करूया नवरराष्ट्र उभारूया ही संकल्प प्रत्यक्षात आणणारे मतदान जनजागृती प्रमुख यशेंद क्षीरसागराने एक आदर्श समाजापुढे ठेवला आहे.