विनापरवाना खैर लाकूड तस्करीवर महाबळेश्वर वन विभागाचा घाव; दोन आरोपींची कबुली
महाबळेश्वर प्रतिनिधी -श्री सुनील लांडगे वन परिमंडळ अधिकारी महाबळेश्वर व कर्मचारी रात्रगस्त करत असताना विनापरवाना खैर प्रजातीची लाकडे वाहतूक करताना महिंद्रा पिकअप MH 08 H 7790 व महिंद्रा स्कार्पियो MH 43 R 0906 वन विभागाने पकडली.
आरोपी संतोष पांडुरंग पार्टे, समीर संतोष पार्टे राहणार केळघर तालुका जावली जिल्हा सातारा यांना ताब्यात घेतले सदर आरोपी यांनी गुन्हा कबूल केला असून वन परिमंडळ अधिकारी महाबळेश्वर यांनी भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 41(2) b अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्हे प्रकरणात गाडी व माल किंमत असे अंदाजे 5,50,000/- माल जप्त केला.
मा. उपवनसंरक्षक सातारा श्री अमोल सातपुते, मा.सहा वनसंरक्षक सातारा श्री प्रदीप रौंदळ मा. वन परिक्षेत्र अधिकारी महाबळेश्वर श्री महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास श्री सुनील लांडगे वन परिमंडळ अधिकारी महाबळेश्वर हे करत आहेत.
“महाबळेश्वर वनविभागाच्या कार्यक्षम व सतर्क कारभारामुळे अवैध लाकूड वाहतुकीसारख्या प्रकारांना प्रभावी आळा बसत आहे.”




