गाव तेथे शिवसेना शाखा काढणार -विकासआण्णा शिंदे
महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष मुख्य नेते ना एकनाथजी शिंदे साहेब यांचा वाढदिवस वाई विधानसभा मतदार संघात विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.
वाई प्रतिनिधी -उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त वाई तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये अनेक गावामध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ, पूर्ण झालेल्या कामांचा लाेकार्पन साेहळा व शिवसेना पक्ष शाखांचा शुभारंभ करण्यात आला. श्री विकास (आण्णा )दिनकर शिंदे शिवसेना वाई विधानसभा प्रमूख (वाई-खंडाळा-महाबळेश्वर) यांच्यावतीने वाई ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप तसेच वाई अक्षर इन्स्टिट्यूट मधील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू व खाऊवाटप करण्यात आला.
तसेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या विशेष सहकार्यामधून मिळालेल्या विकास निधीतून मौजे चिखली मोरजीवाडा गावठाण अंतर्गत रस्ता रू १० लक्ष रुपयांच्या डांबरीकरण-खडीकरण लाेकार्पन, मोरजीवाडा स्मशानभूमी रस्ता काँक्रिटीकरण रु. १० लक्ष, चिखली गावठाण अंतर्गत बंदिस्त गटारे व काँक्रिटीकरण रुपये १० लक्ष, मौजे पसरणी बुवासाहेब रोड खडीकरण डांबरीकरण रुपये १० लक्ष, पसरणी राजेवाडी भैरवनाथ नगर रस्ता खडीकरण डांबरीकरण रुपये ५ लक्ष, मौजे पिराचीवाडी स्मशानभूमी नवीन शेड बांधणे रुपये ५ लक्ष रुपयांच्या कामांचा लाेकार्पन सोहळा मा श्री विकास आण्णा शिंदे, व शिवसेना तालुका प्रमुख रविंद्र भिलारे यांच्या हस्ते संपन्न झाला. तसेच मौजे कुसगाव वरचा वाडा हनुमान सेवा मंडळाच्या पाठीमागील ओढ्याशेजारील संरक्षण भिंत रु ५ लक्ष बांधण्याचा शुभारंभ ही या प्रसंगी करण्यात आला.
तसेच विधानसभा प्रमुख श्री विकास शिंदे, तालुका प्रमुख रविंद्र भिलारे यांच्या उपस्थितीत पिराचीवाडी (धावडी) येथे शिवसेना शाखा क्रं. २२, विठ्ठलवाडी (कुसगांव) शिवसेना शाखा क्रं. २१ व एकसर शिवसेना शाखा क्रं १९ या शाखांचे उदघाटन सोहळा पार पडला
या कार्यक्रमास नितीन चोरट, दत्तात्रय पोळ, सचिन वायदंडे, सोपान चिकणे, पांडुरंग वरे, विकास जाधव, युवराज अण्णा कोंढाळकर, सागर घाडगे, रमेश वरे,प्रदीप गोळे, प्रकाश वरे, संजय महांगडे, सुधाकर पाटील, ब्रह्मदेव वाडकर, बबन दादा चोरगे ,रमेश वाडकर, दत्तात्रय वाडकर, अशोक वाडकर, सत्यवान वाडकर, तुषार वाडकर,ज्ञानदेव वाडकर,सुनील चोरगे, वैभव चोरगे , मनोज मालुसरे, संतोष पिसाळ, रोहित घाडगे, सतीश घाडगे, पांडुरंग वरे, संजय शिंदे, सतीश वाडकर, विशाल वरे, आनंदा तरटे, सचिन घाडगे, शैलेश पवार, आकाश शिंगटे, गीतांजली यादव, आशा मालुसरे, भारती वरे, मंगेश निकम, सचिन मांढरे, बाजीराव पाटणे, चंद्रकांत पाटणे, श्रीधर निकम, रंजना पाटणे, नंदा निकम, सोनल पाटणे, दत्तात्रय कोंढाळकर, संजय कोचळे, विशाल पोळ, अक्षय मांढरे, विलास कोंढाळकर, ओमकार कोचळे, रेखा पोळ, ज्योती महांगडे, प्रेमा उंबरकर तसेच सर्व शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व ग्रामस्थ ,महिला भगिनी माेठ्या संख्येने उपस्थिती हाेती.श्री विकास आण्णा शिंदे यांनी सांगितले गाव तेथे शिवसेना शाखा काढणार आहोत व विकास निधी गावोगावी पोचवणार आहोत सातारा जिल्हा चे लाडके पालकमंत्री शंभूराज साहेब यांच्या माध्यमातून वाई विधानसभा शिवसेना मय करणार आहोत.
