दीपलक्ष्मी पतसंस्था आयोजित गुलदस्ता सदाबहार हिंदी गीतो का नजराना
सातारा दि. 27 ( प्रतिनिधी)दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्या., सातारा आयोजित गुलदस्ता सदाबहार हिंदी व मराठी गीतो का नजराना कार्यक्रम दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल 759 अ शनिवार पेठ सातारा येथे शनिवार दिनांक 28 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी 5:30 वाजता आयोजित करण्यात आलेला आहे.
सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. कामिनी पाटील, सुरेखा शेजवळ, संध्या चौगुले, काका पाटील, अनिल वाळिंबे, रमेश वेलणकर, शिरीष चिटणीस मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
गुलदस्ता या कार्यक्रमाची संकल्पना व संयोजन विजय साबळे यांचे असून सदर गीत मैफिलीमध्ये डॉ. सुनील पटवर्धन, चंद्रशेखर बोकील, डॉ.सुनील सोनवणे, शिरीष खुटाळे, बापूलाल सुतार, नागेंद्र पाटील, संतोष बाचल, उद्धव इंगवले,विठ्ठल जाधव, उमेश खोले, मिलिंद हर्षे,उमाकांत पाटील,वनिता कुंभार, सुषमा बागडे, मंजुषा पोतनीस, मंजिरी दीक्षित, ममता नरहरी, कला चंद,इंद्रायणी कुलकर्णी, दिपाली घाडगे, अरुणा नाझरे, शुभांगी मुरुडकर गायक कलाकार आपली सदाबहार गीते समस्त सातारकर रसिक श्रोत्यांसाठी सादर करणार आहेत. तसेच या सदाबहार कार्यक्रमासाठी सचिन शेवडे यांची ध्वनी व्यवस्था लाभली आहे.
तरी दीपलक्ष्मी पतसंस्था आयोजित गुलदस्ता या सदाबहार हिंदी व मराठी गीतांच्या बहारदार कार्यक्रमास समस्त सातारकर रसिक श्रोत्यांनी यावे असे आवाहन शिरीष चिटणीस यांनी केले आहे.