विद्यार्थ्यांवर हिंदीची सक्ती करू नये-राहुल पवार
आदरणीय राज साहेब ठाकरे यांनी हिंदी सक्तीच्या संदर्भात दिलेले पत्र यावेळी सातारा शहरातील विविध शाळांना देण्यात आले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यात पहिलीपासून हिंदी विषय तृतीय भाषा म्हणून शिकवण्याच्या शैक्षणिक धोरणाचा विरोध केला आहे. राज ठाकरे यांनी सरकारला इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले की, ‘हिंदीची सक्ती मनसे खपवून घेणार नाही. शाळांमध्ये ही भाषा शिकवून दिली जाणार नाही.’माझं पत्र आता शाळांना जाणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला हा निर्णय मागे घेऊ असं सांगितलं होतं.
आज मी तिसरं पत्र लिहिलं आहे.हिंदी भाषा का लादण्याचा प्रयत्न आणि महाराष्ट्राचं हिंदीकरण करण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरु आहे. मुळात सरकारकडून हे सगळं लादलं का जातं आहे? हा माझा प्रश्न आहे. माझी पत्रकार परिषद महाराष्ट्रासाठी, पालकांसाठी, मुलांसाठी, शिक्षकांसाठी, शाळांसाठी आहे. महाराष्ट्राच्या शाळांना हे मान्य आहे का? सरकारला हे कोणतं धोरण आहे ते मला समजलेलं नाही. भाषावर प्रांतरचना झाली आहे तर मग हे भाषा लादण्याचं कारण काय? पत्रकार म्हणून तुम्ही, साहित्यिकांनी, लेखकांनी याबाबत सरकारला प्रश्न विचारला गेला पाहिजे. हा विषय आज लादला गेला तर नजिकच्या काळात मराठीचं अस्तित्व हे संपवून टाकतील. जेवढा या हिंदी सक्तीला विरोध करता येईल तेवढा केला पाहिजे. शाळा हिंदी भाषा कशी शिकवतात तेच आम्ही बघू. महाराष्ट्र सरकारला हे आव्हान वाटत असेल तर आव्हान असंही राज ठाकरे म्हणाले.
पत्रकार परिषदेच्या वेळी राज ठाकरेनी तिसरे पत्र हे महाराष्ट्रातील सर्व शाळांना देणार असल्याचे सांगितले होते. त्या आदेशानुसार सातारा शहरातील विविध विद्यालयांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना सातारा शहराकडून पत्र देण्यात आले. सातारा शहरातील रयत शिक्षण संस्थेचे महाराजा सयाजीराव विद्यालय महर्षी कर्वे शिक्षण संस्थेचे कन्या शाळा तसेच अंनत इंग्लिश स्कूल या विविध विद्यालयातील मुख्याध्यापकांना आदरणीय राज साहेब ठाकरे यांनी हिंदी सक्तीच्या संदर्भात दिलेले पत्र पोहोच करण्यात आले. व संबंधित मुख्याध्यापकांना विनंती करून आपण विद्यार्थ्यांवर हिंदीची सक्ती करू नये अशी विनंती सातारा शहर अध्यक्ष राहुल पवार यांचे कडून करण्यात आली यावेळेस मनसेचे शहर उपाध्यक्ष भरत रावळ,आजार शेख मनसे जनधिकार सेना शहराध्यक्ष संदीप दुढले ओंकार साळुंखे इमरान शेख कार्तिक रावळ उपस्थित होते शहरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
