तांबवेच्या सरपंचपदी जयश्री कबाडे यांची बिनविरोध निवड
तांबवे- येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी जयश्री हणमंत कबाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पूर्वीच्या सरपंच शोभाताई शिंदे यांची मुदत संपल्याने कबाडे यांची निवड करण्यात आली.
तांबवे ग्रामपंचायतीत २०२० मध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, सह्याद्री साखर कारखान्याचे माजी संचालक (कै.) पी. डी. पाटील, सह्याद्रीचे संचालक रामचंद्र पाटील, कोयना बँकेचे संचालक अविनाश पाटील, दिलीप पाटील, सतीश पाटील, दिनकर बाबर, बाळासाहेब शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्या विजयाताई
पाटील, माजी उपसरपंच प्रकाश पवार, गुणवंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील भैरवनाथ ग्रामविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली होती. आघाडी अंतर्गत ठरल्यानुसार शोभाताई शिंदे यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर रिक्त झालेल्या जागी आज सरपंच निवड करण्यात आली. ग्रामपंचायतीच्या
विशेष बैठकीत जयश्री कबाडे यांची तांबवेच्या सरपंच निवडीसाठी नाव सुचवण्यात आले. त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निरीक्षक दीपसागर पोतदार यांनी जाहीर केले. निवडीनंतर सरपंच जयश्री कबाडे यांचा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, कोयना बँकेचे संचालक अविनाश पाटील, दिलीप पाटील, उपसरपंच अॅड. विजयसिंह पाटील, ग्रामपंचायत सदस्य शोभाताई शिंदे, अमरनाथ गुरव, धनंजय ताटे, विठोबा पाटील, देवानंद राऊत, उत्तम साठे, नीता पवार, रेश्मा वाडते, सुवर्णा कुंभार, नंदाताई पाटील, स्वाती काटवटे, ग्रामसेवक दीपक दवंडे.
तांबवे ग्रामपंचायत येथे यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन . स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त तांबवे ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस सरपंच जयश्री कबाडे, उपसरपंच अॅड. विजयसिंह पाटील, प्रदीप पाटील, अविनाश पाटील, दिलीप पाटील, धनंजय ताटे, विस्तार अधिकारी पोतदार, ग्रामविकास अधिकारी दवंडे यांच्यासह मान्यवरांनी अभिवादन केले.
तांबवे ता कराड येथे नवीन सरपंच जयश्री कबाडे यांचा सत्कार करताना प्रदीप पाटील, शोभाताई शिंदे. या वेळी दिलीप पाटील, अविनाश पाटील, अॅड. विजयसिंह पाटील, दीपसागर पोतदार, दीपक दवंडे, दिनेश मोगरे.