Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » तुषार दोषी साताऱ्याचे नवे पोलीस अधीक्षक

तुषार दोषी साताऱ्याचे नवे पोलीस अधीक्षक

तुषार दोषी साताऱ्याचे नवे पोलीस अधीक्षक

समीर शेख यांची बृहन्मुंबई पोलीस उपायुक्त पदी बदली

राज्य सरकारकडून आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यां करण्यात आले आहेत. यामध्ये सातारा जिल्ह्याचे जिल्हा पोलीस प्रमुख पदी तुषार दोषी यांची लोहमार्ग पुणे पोलीस अधीक्षक येथून सातारा जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे.

कोण आहेत तुषार दोशी?

तुषार दोशी हे २००१ मध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर पोलीस दलात भरती झाले. मी पदवी घेतल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा दिली आणि पोलीस खात्यात भरती झालो, असं तुषार दोषींनी नवी मुंबईत पोलीस उपायुक्तपदी असताना दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते.

राज्य सरकारने २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश आज काढले असून, साताऱ्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांची बृहन्मुंबई पोलीस उपायुक्त पदी बदली करण्यात आली आहे.तर त्यांच्या जागी तुषार दोषी यांना सातारा जिल्हा पोलीस प्रमुख पदी बदली देण्यात आले आहे . तात्काळ बदली ठिकाणी हजर होण्याचे आदेश राज्य सरकारच्या वतीने बजावण्यात आले आहेत

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

Live Cricket