Post Views: 52
मंगळवार, २२ ऑक्टोबर रोजी सातारा येथे मोफत वंध्यत्व निवारण तपासणी शिबिर
सातारा : रुबी हॉल, पुणे येथील प्रदीर्घ अनुभवी,प्रमुख आय.व्ही.एफ. आणि एन्डोस्कोपी तज्ज्ञ डॉ. सुनीता तांदुळवाडकर या सातारा भेटीला येत आहेत. वंध्यत्व समस्या निवारण संदर्भात सातारा येथे मंगळवार, दिनांक २२ ऑक्टोबर रोजी ११ ते २ या वेळेत शिबिर आयोजित केले आहे. ट्युबल ब्लॉक, शुक्राणूंची संख्या कमी-गती कमी होणे, असामान्य शुक्राणू गर्भाशयाच्या गाठी इ. लक्षणे/ समस्या असलेल्या रुग्णांना डॉ. तांदुळवाडकर मार्गदर्शन करतील. तरी समस्या निवारणासाठी या शिबिराचा रुग्णांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन रुबी हॉल क्लिनिकचे असिस्टंट जनरल मॅनेजर डॉ. संजय लावंड यांनी केले आहे.
