जयाभाऊला निवडून आणण्यासाठी जीवाची बाजी लावतोय – शेखरभाऊ गोरे ; जनतेनेच भाजपचा चौकार निश्चित केलाय.
सातारा (प्रतिनिधी) माण-खटाव तालुक्यात भाजप व महायुती सरकारने मोठी ताकद दिल्याने आ.जयकुमार गोरेंनी विकासाची गती कायम ठेवत चौफेर विकासपर्व उभे केले आहे.सिंचन योजना शेवटच्या टप्प्यात आणून ठेवल्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आपणही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपला पाठींबा दिला आहे. आपल्यालाही देवेंद्र फडणवीस विधानमंडळात काम करण्याची संधी देणार असल्याने माणखटावच्या विकासासाठी दोनदोन आमदार मिळणार आहेत.त्यामुळे आम्ही दोघे मिळून माणखटावसाठी भरीव निधी आणून सर्व रखडलेल्या योजना पूर्ण करून विकासकामाचा पर्वत उभा करू.यासाठी भाजपाची ताकद वाढवण्यासाठी बुधवार दि.20 नोव्हेंबर रोजी कमळ या चिन्हासमोरील बटण दाबून माणखटावचे भाजपचे उमेदवार आ.जयकुमार गोरे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणूयात.आजपर्यंत दुसऱ्यांना निवडून आणण्यासाठी पदरमोड केलीय. पण आता तर आपण सख्ख्या भावाला पाठींबा दिलाय.त्यामुळे जयाभाऊला विजयी करण्यासाठी जिवाची बाजी लावतोय असे प्रतिपादन सातारा जि.बँकेचे संचालक शेखरभाऊ गोरे यांनी केले.
माणखटाव तालुक्यात आ.जयकुमार गोरेंच्या प्रचारार्थ गावभेटी दरम्यान ते बोलत होते.
शेखरभाऊ गोरे म्हणाले,आजपर्यंत राष्ट्रवादी ने आपला फक्त वापर करून घेत फसवणूक केली आहे.सख्ख्या भावाविरोधात गेली 12 वर्षे राजकीय संघर्ष केला.तेव्हा यांना गोड वाटत होत.पण आता आम्ही एकत्र आलोय.जयाभाऊ अन शेखरभाऊ एकत्र आल्याने माणखटावची जनता आनंदी आहे.दोघांच्या कार्यकर्त्यांत नवचैतन्य निर्माण झालेय.आता माणखटावच्या विकासासाठी दोघांची ताकद मिळाली आहे.तुम्ही बिनधास्त रहा गोरे बंधू माणखटावचा सर्वांगीण विकास साधून आयडीयल मतदारसंघ बनवून दाखवू असेही ते म्हणाले.
माणखटाव तालुक्यात आपण स्वखर्चातून विविध विकासकामे केलीत.टंचाई काळात टँकरने मोफत पाणीपुरवठा करतोय.रूग्णांच्या सेवेसाठी मोफत रूग्णवाहिका लोकार्पण केलीय.त्यामुळे हजारो रूग्णांचे जीव वाचले आहेत.गरजू मुलांना शैक्षणिक मदती केल्यात.असह्य ,आर्थिक अडचणीत आलेल्या लोकांना मदती केल्यात.अनेकांना रोजगार उपलब्ध करून देत व्यवसाय करण्यास मदत केलीय.ज्या ज्या लोकांना आपण मदत केलीय ते सर्वजण आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.तीच ताकद आपण जयकुमार गोरेंच्या पाठीशी उभी केली आहे.हाच पाठींबा त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणेल.फक्त आपल्याला त्यांचे मताधिक्य वाढवण्यासाठी प्रयत्न करायचेत असे आवाहन ही शेखरभाऊ गोरे यांनी केले आहे.
– गोरे बंधू एकत्र आल्याने अनेकांना पोटशूळ….
माणखटाव मतदारसंघात जयाभाऊ अन शेखरभाऊ आम्ही दोघ एकत्र आल्याने अनेकांच्या पोटात दुखायला लागलय.सत्ता व खुर्चीसाठी सर्व हेवदावे,भांडणतंटे विसरून विरोधक एकत्र आले तर चालतात.अकलूजला मोहिते-पाटील बंधू एकत्र आलेले चालतात,त्यांचे कट्टर विरोधक उत्तम जानकर एकत्र आलेले चालतात.साताऱ्यात उदयनराजे- शिवेंद्रबाबा एकत्र आलेले चालतेत. कुकुडवाड गटातले आजपर्यंत विरोधात राहून एकमेकांना शिव्या घालणारे पै पाहुणे एकत्र आलेले चालतात.अन मग बाबानो आमच तर रक्त एकच आहे.आम्ही एका आईचे दोन मुले आहोत.मग आम्ही एकत्र आलो तर तुमच्या पोटात दुखण्याच कारण काय.माणखटावच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपाबरोबरच देवेंद्र फडणवीस यांची ताकद वाढवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत.
– राष्ट्रवादीला खिंडार…!
राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांचा शेखर गोरे गटात प्रवेश..
शेखरभाऊ गोरे यांनी भाजपला पाठींबा देताच राष्ट्रवादी कॉग्रेसला धक्यावर धक्के देत माण खटाव तालुक्यातील विविध गावातील प्रमुख पदाधिकारी,महिलावर्ग, कार्यकर्त्यांना आपल्या गटात प्रवेश देत खिंडार पाडले आहे.जाहीर प्रवेश,कोपरासभा,बैठका, पदयात्रांच्या माध्यमातून शेखरभाऊ गोरेंनी आपली ताकद दाखवून दिली असून या ताकदीचा फायदा आ.जयकुमार गोरेंना निश्चितच होणार आहे.