माजी सैनिकांची ताकद शिवेंद्रसिंहराजेच्या पाठीशी उभी करणार
लवकरच साताऱ्यात माजी सैनिक मेळावा होणार :-इंद्रजित भिलारे
भुईंज :-(महेंद्रआबा जाधवराव) आमदार शिवेंदरसिंहराजे भोसले यांनी कायम सर्वसामान्य जनतेसोबतच माजी सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सातारा जावली मतदार संघातील माजी सैनिकांची ताकद आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठीशी उभी करणार असल्याचे प्रतिपादन शिवसेना सैनिक आघाडीचे राज्य उपाध्यक्ष इंद्रजित भिलारे यांनी केले
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या शिवसेना सैनिक आघाडीच्या राज्य उपाध्यक्ष पदी निवड झालेले इंद्रजित भिलारे यांनी नुकतीच सातारा जावलीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची माजी सैनिकांच्या शिष्टमंडळा सह सदिच्छा भेट घेतली यावेळी बोलताना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, सातारा जावली तालुक्यातील माजी सैनिकांच्या साठी सदैव कार्यरत राहणार असून त्यांची देशसेवा प्रेरणादायी असून त्यांच्या बळावर आगामी विधानसभा निवडणूक ताकदीने लढवू यावेळी बोलताना इंद्रजित भिलारे म्हणाले आगामी काळात विधानसभा निवडणुकीआधी सातारा जावली तालुक्यातील माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांचा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मेळावा घेणार असून महायुती च्या माध्यमातून शिवसेना सैनिक आघाडी व सर्व सातारा जावली मधील माजी सैनिक शिवेंद्रसिंहराजे च्या पाठीशी ठाम पणे उभे असून राज्यात मोठ्या मताधिक्याने त्यांना निवडून आणण्या साठी प्रयत्नशील राहणार आहोत.
याप्रसंगी सातारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आप्पा पडवळ, डॉ.सुहास लावंड, सातारा शहर अध्यक्ष निलेश निकम,सातारा जिल्हा ग्रामीण अध्यक्ष संजय निंबाळकर, माजी सरपंच व माजी सैनिक सखाराम पवार,जिल्हा संपर्कप्रमुख शंकरराव खापे,सचिन साबळे,भोसले , घाडगे,खरात,यांच्या सह अन्य पदाधिकारी उपस्थित होते