साताऱ्यात खत खरेदी आता मोबाईलवरून! एफएफएस प्रणाली सुरू; रांगांचा त्रास होणार कमी भाग्यश्री फरांदे यांची माहिती; वाढेफाटा येथील मोरे फर्टिलायझर्समध्ये खत बुकिंगचा शुभारंभ संयमी काका धुमाळ यांची सातारा जिल्हा बँकेत बिनविरोध निवड; श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजेंनी कार्यकर्त्यांना दिली ताकद! मतदानासाठी ११ प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य – विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले पांचगणीच्या शैक्षणिक क्षेत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव!अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी मीत जिग्नेश दुधात याची ICAI इंटरमिजिएट परीक्षेत देशात २२ वी रँक; ४६२ गुणांसह दैदीप्यमान यश महाबळेश्वर नगरपरिषदेची धडक कारवाई पॅनोरमा परिसरातील अतिक्रमणे हटवून रस्ता व फूटपाथ पर्यटकांसाठी केला मोकळा पुन्हा अतिक्रमण केल्यास दंडात्मक व कायदेशीर कारवाईचा इशारा जिल्हा परिषद शाळा कोडोली येथे जलसेवा संकल्प अभियानांतर्गत चित्रकला स्पर्धा व जलप्रतिज्ञा उपक्रम संपन्न
Home » Uncategorized » निवडणुकीपुरतं उगवणाऱ्यांनी एक तरी काम केलं आहे का? श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजेंचा सवाल;

निवडणुकीपुरतं उगवणाऱ्यांनी एक तरी काम केलं आहे का? श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजेंचा सवाल;

निवडणुकीपुरतं उगवणाऱ्यांनी एक तरी काम केलं आहे का? श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजेंचा सवाल;

श्रीमंत छ. शिवेंद्रराजेंना मताधिक्य देण्याचे केले आवाहन

भुईंज (महेंद्रआबा जाधवराव )आ.श्रीमंत छ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या माध्यमातून सातारा- जावली मतदारसंघात विकासपर्व सुरु आहे. सर्वत्र कोट्यवधींची विकासकामे मार्गी लावली आहेत. पाच वर्ष कधीही नजरेस न पडणारे विरोधक निवडणूक आली की मतांचा जोगवा मागत फिरत आहेत. निवडणुकीपुरतं उगवणाऱ्यांनी एक तरी काम केलं आहे का? त्यांना मते मागण्याचा नैतिक अधिकार आहे का? हा प्रश्न मतदारांनी विरोधकांना करावा आणि जनतेसाठी अहोरात्र झटणाऱ्या, विकासकामे मार्गी लावणाऱ्या आ. शिवेंद्रराजेंना विक्रमी मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी केले. 

           सातारा- जावली विधानसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रचारार्थ सातारा शहरात विविध भागामध्ये पदयात्रांचा धडाका सुरु आहे. सोमवारी सकाळी सेनॉर चौक, आंदेकर चौक, बाबर कॉलनी, डॅनी पवार, झेंडा चौक, बाळासो भुजबळ घर, भैरवनाथ मंदिर, पटांगण ते जगन्नाथ किर्दत घर अशी भव्य पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेत भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, आरपीआयसह महायुतीतील सर्व घटकपक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, दोन्ही आघाड्यांचे सर्व आजी – माजी पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते. ठिकठिकाणी पदयात्रेचे फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि फुलांच्या वर्षावात स्वागत करण्यात आले. पदयात्रेत हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाल्याने पदयात्रा मार्गाला यात्रेचे स्वरूप आले होते. वेदांतिकाराजेंनी पदयात्रा मार्गावरील प्रत्येक घरात जाऊन नागरिकांचे आशीर्वाद घेतले आणि त्यांच्याशी संवाद साधला.  

           सातारा शहरासह संपूर्ण मतदारसंघाचा कायापालट करून शिवेंद्रराजेंनी मतदारसंघाला ‘आयडियल’ मतदारसंघ बनवले आहे. प्रत्येकाच्या अडीअडचणीत धावून जाणारा, प्रत्येकाचे प्रश्न, समस्या सोडवणारा आपला हक्काचा माणूस म्हणजे शिवेंद्रराजेच आहेत. विरोधकांचे या उलट आहे. त्यांना जनतेचे काहीही घेणेदेणे नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी विरोधाला विरोध म्हणून निवडणूक लढवणाऱ्या अशा स्वार्थी लोकांना मतदारसंघातील जनतेने चांगलेच ओळखले आहे. त्यांच्या भूलथापांना जनता भुलणार नाही. जनतेच्या हक्काच्या शिवेंद्रराजेंचा विजय निश्चित आहे. पण, विक्रमी मताधिक्य देऊन एक वेगळा इतिहास घडवण्यासाठी सर्वांनी मतदान करावे आणि या ऐतिहासिक विजयात आपले योगदान द्यावे, असे आवाहन सौ. वेदांतिकाराजे यांनी केले. 

           मंगळवार दि. १२ रोजी सकाळी ७ वाजता समर्थ मंदिर, बोगदा, पापाभाई पत्रेवाले, रविंद्र ढोणे घर, खारी विहीर, महेश महाडिक घर, राजू भोसले घर, डफळे हौद, विश्वेश्वर चौक, गुजर आळी, कात्रेवाडा, हेडगेवार चौक, रमेश जाधव दुकान, चांदणी चौक ते राजवाडा अशी पदयात्रा, सायंकाळी ६. ३० वाजता महादेव मंदिर जवळ दौलतनगर आणि रात्री ८ वाजता विजय मंडळ शिर्के शाळा येथे कोपरा सभा होणार आहे. पदयात्रा आणि कोपरा सभेला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

साताऱ्यात खत खरेदी आता मोबाईलवरून! एफएफएस प्रणाली सुरू; रांगांचा त्रास होणार कमी भाग्यश्री फरांदे यांची माहिती; वाढेफाटा येथील मोरे फर्टिलायझर्समध्ये खत बुकिंगचा शुभारंभ

साताऱ्यात खत खरेदी आता मोबाईलवरून! एफएफएस प्रणाली सुरू; रांगांचा त्रास होणार कमी भाग्यश्री फरांदे यांची माहिती; वाढेफाटा येथील मोरे फर्टिलायझर्समध्ये

पांचगणीच्या शैक्षणिक क्षेत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव!अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी मीत जिग्नेश दुधात याची ICAI इंटरमिजिएट परीक्षेत देशात २२ वी रँक; ४६२ गुणांसह दैदीप्यमान यश

Live Cricket