“सामाजिक बांधिलकी जपत शिक्षण क्षेत्रात अग्रगण्य स्थान मिळवणारी संस्था म्हणजे ‘सक्सेस ॲबॅकस’ — संस्थेच्या नव्या कार्यालयाच्या उद्घाटनावेळी मा. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे गौरवोद्गार”
सातारा, दि. २ नोव्हेंबर २०२५ : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या सक्सेस ॲबॅकस अँड एज्युकेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेच्या नव्या कार्यालयाचे भव्य उद्घाटन राज्याचे बांधकाम मंत्री मा.छत्रपती.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या शुभहस्ते उत्साहात व थाटात पार पडले.

या सोहळ्याला संस्थेचे संस्थापक व संचालक किरण पाटील संचालिका मिनाक्षी पाटील,प्रकाश पाटील, माधुरी पाटील,उत्तम पाटील, रवींद्र खंदारे, ॅड. धिरज घाडगे , मंगेश प्रधान , श्रीधर कांग्राळकर ,जगदीश शिर्के, मनोज देशमुख , आशुतोष चव्हाण ,संग्राम सांगळे , सुनिल सांगळे , सतीश सांगळे ,चेतन सांगळे, प्रा. दशरथ सगरे , विनोद कुलकर्णी, रवींद्र झुटींग ,अमोल मोहिते ,प्रगती पाटील, रोहित निलाखे, संदीप जाधव , योगेंद्र सावंत , डॉ. विक्रांत देशमुख, आशुतोष गोखले , शशिकांत झाजुर्णे , विठ्ठल जाधव , जीवन जगताप , तुषार पाटील , प्रकाश इनामदार , विकास सनस , जयश्री शेलार , निलेश काळे , धनंजय कल्याणकर, दिलीप जाधव , सचिन सूर्यवंशी , फिरोज पठाण , विजय देसाई, जयवंत चव्हाण , वैशाली निंबाळकर , सूर्याजी पाटील , श्रावण पाटील ,प्रवीण शेळके , गोपी फडतरे , राजेश निंबाळकर , संजय लाड , संजय फडतरे , प्रशांत कणसे , ओंकार पंडित , गणेश काटे आदि मान्यवर तसेच संस्थेच्या विविध शाखांचे फ्रेंचायझी धारक, विद्यार्थी, पालक, हितचिंतक व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटनावेळी परिसरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
नवीन कार्यालय हे १६०० चौ. फूट क्षेत्रफळात आधुनिक सुविधांनी सुसज्ज, आकर्षक डिझाईन व प्रेरणादायी वातावरणासह उभारण्यात आले आहे. कार्यालयात स्वतंत्र स्टुडिओ , प्रशस्त कार्यक्षेत्र, विविध विभाग तसेच आधुनिक तांत्रिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
उद्घाटनप्रसंगी बोलताना मा. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले की,
“सक्सेस ॲबॅकस ही संस्था महाराष्ट्रातील अग्रगण्य शैक्षणिक संस्था असून ती केवळ शिक्षण क्षेत्रापुरती मर्यादित नसून सामाजिक जबाबदारीही समर्थपणे पार पाडते. संस्थेचे संस्थापक किरण सर यांचे मार्गदर्शन आणि कार्यतत्परता हीच संस्थेच्या यशाची गुरुकिल्ली आहे. साताऱ्यातील जवळपास प्रत्येक सामाजिक उपक्रमामध्ये त्यांचा सहभाग असतो. समाजासाठी त्यांनी दिलेले योगदान अनुकरणीय आहे. त्यांच्या कार्याचे जितके कौतुक केले जाईल तितके थोडेच आहे.”
या वेळी उपस्थित मान्यवरांनीही संस्थेच्या सातत्यपूर्ण प्रगतीचे आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाचे कौतुक केले. कार्यक्रमादरम्यान पाहुण्यांनी नव्या कार्यालयाचा फेरफटका मारला व आधुनिक रचना आणि शैक्षणिक सुविधा पाहून कौतुक केले.
संस्थेचे संस्थापक किरण सर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,
“गेल्या १२ वर्षांपासून आम्ही मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करत आहोत. संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रात ॲबॅकस, वेदिक मॅथ्स, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आदी उपक्रम यशस्वीपणे राबवले जात आहेत. सर्व शाखाधारक, पालक विद्यार्थी, यांना सर्वोत्तम सेवा देता यावी, आणि अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत गुणवत्तापूर्ण ॲबॅकसचे शिक्षण पोहोचविणे या उद्देशाने या नवीन कार्यालयाची रचना केली असून नवीन कार्यालय हे आमच्या कार्याच्या नव्या पर्वाची सुरुवात असून येत्या काळात आणखी शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबवण्याचा आमचा संकल्प आहे.”
सक्सेस ॲबॅकस संस्थेने गेल्या काही वर्षांत उल्लेखनीय प्रगती साधली आहे. संस्थेमार्फत आजपर्यंत ३५,००० हून अधिक विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेतले असून राज्यभरात ५०० पेक्षा अधिक शाखा कार्यरत आहेत संस्थेने शिक्षणातील नवनवीन पद्धती अवलंबून विद्यार्थ्यांमध्ये गणिताबद्दलची भीती दूर करून आत्मविश्वास निर्माण केला आहे. उपस्थित मान्यवरांनी संस्थेच्या सातत्यपूर्ण यशाचा गौरव करताना सांगितले की, “सक्सेस ॲबॅकस ही संस्था केवळ शिक्षणच देत नाही, तर विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, व्यक्तिमत्त्व विकास आणि सामाजिक जाण निर्माण करते. साताऱ्यातून सुरू झालेली ही संस्था आज राज्यभरात प्रेरणास्थान ठरली आहे.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिल मोरे यांनी उत्तमरीत्या केले, तर पाहुण्यांचे स्वागत व आभार प्रदर्शन किरण पाटील यांनी केले.
नव्या कार्यालयाच्या माध्यमातून सक्सेस अँड एज्युकेशन इंडिया प्रा. लि. संस्था आणखी सक्षमपणे पुढे वाटचाल करून विद्यार्थ्यांच्या व समाजाच्या विकासासाठी सातत्याने योगदान देईल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.




