गोङोलीनाका ते एसटी स्टँड मार्ग वरील दुभाजकातील झाडे व फुल झाडे करपली
वृक्षप्रेमी मधून तीव्र नाराजी, संबंधित यंत्रणेची दुर्लक्ष
सातारा – रस्ते वाहतूक सुरक्षितेबरोबरच सातारच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी रस्त्याच्या मधोमध उभारलेले दुभाजक व या दुभाजकात लाखो रुपये खर्च करून लावण्यात आलेल्या विविध प्रकारची झाडे व रंगीबेरंगी फुलझाडे शहराचे नैसर्गिक सौंदर्य फुलवत होते असे चित्र एसटी स्टँड ते गोडोली नाका मार्गवरील दुभाजकांमध्ये पाहिला मिळत होते . झाडे व विविध प्रकारची फुल झाडांकडे प्रशासन यंत्रणेच्या झालेल्या दुर्लक्षामुळे ही झाडे व विविध प्रकारची फुलझाङे सध्या कोमजून गेली आहेत सुंदर सातारा हरित व सुशोमित सातारा हे ब्रीद वाक्य घेवून या मार्गावरून मोठा गाजावाजा करीत झाडे लावली विविध प्रकारचे झाङे व रंगीबेरंगी फुलझाडे पावसाळ्यात पूर्णपणे बहरली होती या मार्गावरून प्रवास करताना प्रत्येकाला आल्हादायक वाटत होते निसर्ग सौंदर्य फुलवणारे हे दुभाजक पाहून वृक्षप्रेमींना आनंद वाटत होता येथील हिरवीगार वृक्ष पाहून असंख्य वृक्षप्रेमी आपल्या मोबाईल मध्ये निसर्गाचे चित्रण करीत होते परंतु गेल्या काही महिन्यापासून या दुभाजकातील झाडे निगे अभावी दयनीय स्शिती झाली आहे दुभाजकातील झाडे व विविध प्रकारची फुल झाडांना पाणी न मिळाल्याने ती वाळून चाललेली आहेत प्रशासन यंत्रणेचा हलगर्जी पणामुळे वृक्ष नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत आता या मार्गावरून ये जा करणाऱ्या प्रत्येकाला हा परिसर आता भकास वाटत आहे याबाबत वृक्षप्रेमीतून संबंधित यंत्रणेबाबत संताप व्यक्त होत आहे.
चौकट – गोडोली नाकात एस.टी स्टँडपर्यंतच्या मार्गावरील दुभाजकात वृक्ष लावताना या दुभाजकात गाळाची माती, खंते घालून वाफे बनवण्यात आले होते यासाठी लाखो रुपये प्रशासनाने खर्च केले आहेत दुभाजकात लावलेल्या वृक्षामुळे या मार्गावरून प्रवास करणे सुखकारक वाटत होते दुभाजकात हिरवीगार वृक्ष बहरल्याने या ठिकाणी पशुपक्षांचाही वावर मोठ्या प्रमाणात वाढला होता त्याचप्रमाणे वायू ध्वनी प्रदूषणावर ही नियंत्रण होत होते परिसरातील बहरलेल्या वृक्षामुळे स्वच्छ हवा ये जा करणाऱ्या नागरिकांना मिळत होती
दुभाजकातील बहरलेले वृक्ष डोळ्यादेखत वाळून जाताना प्रत्येक वृक्षप्रेमीच्या मनाला वेदना होत आहेत शहराच्या नैसर्गिक सौंदर्य फुलवणारे झाडे व विविध प्रकारची फुलझाडे केवळ पाण्याअभावी करपून जात आहेत संबंधित यंत्रणेने याबाबत तातडीने लक्ष घालून वृक्षांना जीवदान द्यावे
श्रीरंग काटेकर सातारा
वृक्षप्रेमी
