गझल गायकीतील बादशहा तलत मेहमूद यांच्या बहारदार गाण्यांचा कार्यक्रमास प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद
सातारा :”फिर वही शाम वही गम वही तन्हाई है “, मखमली आवाजाचे व गझल गायकीतील बादशहा तलत मेहमूद यांच्या बहारदार गाण्यांचा कार्यक्रम रविवार दिनांक 22 सप्टेंबर सन 2024 रोजी सायंकाळी दीपलक्ष्मी संस्कृती हॉल सातारा येथे पार पडला . या संगीत कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाली. याची संकल्पना कला सरगम चे संस्थापक मा. अनिल वाळिंबे असून गायक अनिल पांडे यांनी संयोजन केले होते .
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. डी एन वैद्य ,अनिल वाळिंबे, रमेश वेलणकर व शिरीष चिटणीस हे होते. शिरीष चिटणीस यांनी प्रास्ताविक केले . असा कार्यक्रम आपण पुण्यातही घेऊ शकतो व त्याची जबाबदारी मी घेईन असे त्यांनी आवर्जून सांगितले . माजी आयुक्त मा . डी एन वैद्य यांनी याप्रसंगी आपले विचार मांडले . सातारा शहरामध्ये दोन तीन मोठे हॉल एकत्र असणाऱे सांस्कृतीक संकुल असावे व त्यासाठी प्रायोजक व जागा मिळवण्यासाठी मी स्वतः प्रयत्न व मदत करेन असे सांगितले .
या कार्यक्रमासाठी गायक म्हणून डॉ. रवींद्र पारसनीस , जयंत सरवटे , सुनील पटवर्धन , एडवोकेट लक्ष्मीकांत आघोर , अरुण कुलकर्णी , सौ माणिक सरवटे , प्रिया अघोर , मधु गिजरे , विजया चव्हाण आणि मुकुंद पांडे यांनी बहारदार गीते गायिली .
कार्यक्रमा दरम्यान ज्येष्ठ समीक्षक अनिल वाळिंबे व रमेश वेलणकर यांनी आपले विचार व मते मांडली व गायकांचे व निवेदकाचे कौतुक केले . या कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण , नर्म विनोदी शैलीतील व खुसखुशीत असे निवेदन डॉ. मुरलीधर वारुंजीकर यांनी केले . ध्वनी संयोजन व्यवस्था कुंभार यांनी योग्य पद्धतीने सांभाळली .
या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद होता . असे कार्यक्रम पुन्हा पुन्हा घेतले जावेत असे अनेक श्रोत्यांनी सुचविले .