सुपने येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात १०० दिवस क्षयरोग मोहीमेची सांगता
कराड- सुपने येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात १०० दिवस क्षयरोग मोहीमेची सांगता आज जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साधुन आरोग्य तपासणी शिबिर घेवुन करण्यात आली. यावेळी क्षयरोगाच्या अनुशंघाने केलेल्या शिबीरीत १०० हुन अधिक जणांची तपासणी करण्यात आली.
गटविकास अधिकारी प्रताप पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र माळी, तालुका पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, मोटर वाहन निरीक्षक प्रसन्ना धामणे, विस्तार अधिकारी बाळासाहेब सातपुते, आरोग्य सहाय्यक संतोष मोहिते, क्षयरोग पर्यवेक्षक प्रदीप माने, वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित ठिगळे, डॉ. भारती मस्कर यांच्यासह विविध गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ, प्राथमिक आरोग्य केंद्र कर्मचारी, गटप्रवर्तक, आशा स्वयंसेविका आदी उपस्थित होत्या. गटविकास अधिकारी प्रताप पाटील म्हणाले, क्ष्षयरोगाच्या रुग्णांसाठी मदत करणारे निक्षय मित्र तयार करण्यासाठी पंचायत समितीमार्फत जास्तीत जास्त लोकांना तयार करून मदत करण्याचा प्रयत्न करू. सुपने आरोग्य केंद्राने चांगले काम करुन जिल्ह्यात नावलौकीक मिळावावा. पोलीस निरीक्षक जगताप म्हणाले, आरोग्य यंत्रणेमार्फत खुप चांगली सेवा दिली जाते. मात्र्र अनेकदा एखादी सेवा मिळाली नाही की त्या यंत्र्रणेला दोष दिला जातो. खरेतर सरकारी आरोग्य यंत्र्रणेत चांगली सेवा मिळते. आरोग्य विभागाचे काम चांगले असुन त्या यंत्र्रणेत काम करणारे डॉक्टर, कर्मचारी हे कौतुकास पात्र्र आहेत. यावेळी शंभर दिवस क्षयरोग शोध मोहीम या मोहिमेअंतर्गत उत्कृष्ट काम केल्याबद्दल मुंढे उपकेंद्रांतर्गत सर्व कर्मचारी व आशा स्वयंयेविका आणि क्षयरोग रुग्णांना चांगली सेवा दिल्याबद्दल औषध निर्माण अधिकारी मनिषा मराठे यांचा सत्कार गटविकास अधिकारी श्री. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. बलवीर राजगडकर यांनी प्रास्ताविक केले. शंभर दिवस कार्यक्रमांतर्गत केलेल्या कामाची माहिती भुजंगराव पाटील, दिपक घोरपडे यांनी दिली, पंकज यादव यांनी जागतिक क्षयरोग दिन, क्षयरोग आजार याबद्दल सविस्तर माहिती दिली. वैद्यकीय अधिकारी डॉ.अमित ठिगळे यांनी आभार मानले.
