Post Views: 53
बबनराव लोणीकरांना माफी नाही तर ठोका, ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावरून बच्चू कडू भडकले
प्रतिनिधी -भाजपचे नेते बबनराव लोणीकरांवर बच्चू कडू यांनी संताप व्यक्त केल्याचे पाहायला मिळत आहे. बबनराव लोणीकरांना माफी नाही तर ठोकायला पाहिजे, असं बच्चू कडू म्हणाले. वादग्रस्त वक्तव्यानंतर टीकेची झोड उठवली जात असताना बच्चू कडू देखील आक्रमक झाले आहेत. इतकंच नाहीतर शेतकऱ्यांना जिथे बबनराव लोणीकर दिसतील तिथे त्यांना ठोकायला हवं, असा घणाघातही बच्चू कडू यांनी केला आहे.
शेतकऱ्यांबद्दल केलेल्या वादग्रस्त केलेल्या वक्तव्यावर बोलताना बच्चू कडू म्हणाले, ‘लोणीकर ज्या पद्धतीने बोलताय आणि कृषीमंत्री देखील बोलताय त्यामुळे त्याला माफी मागून चालणार नाही. तर ठोकून पुरून उरलं पाहिजे. शेतकऱ्यांनी त्यांना रस्त्यावर फिरूच दिलं नाही पाहिजे.’, असं बच्चू कडू म्हणाले.
