वाई इनरव्हील क्लब च्या अध्यक्ष पदी सौ सुनीता सतीश पानसे यांची निवड
वाई इनरव्हील क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात
वाई, दि. २६ : येथील इनरव्हील क्लबच्या अध्यक्ष पदी सौ सुनीता पानसे तर सचिवपदी सरिता भणगे यांचा पदग्रहण समारंभ उत्साहात पार पडला.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून रोटेरियन डिस्ट्रिक्ट गव्हर्नर स्वाती हेरकळ, ज्येष्ठ सदस्या पीडीसी रोहिणी वैद्य, तसेच मावळत्या अध्यक्षा भावना गायकवाड, सचिव तेजल सावंत, रेखा चिरगुटे यांची प्रमुख उपस्थित होती.
प्रारंभी मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून गणेश वंदनेने कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. मावळत्या अध्यक्षा भावना गायकवाड यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या सेवाकार्याचा आढावा घेतला. सचिव तेजल सावंत यांनी अहवाल सादर केला.
नवनिर्वाचित अध्यक्षा सुनीता पानसे यांनी मावळत्या अध्यक्षा भावना गायकवाड यांच्याकडून पदभार स्वीकारला, तर सचिवपदाचा कार्यभार सरिता भणगे यांनी स्वीकारला, तसेच उपाध्यक्ष सरिता जमदाडे, ट्रेझर तेजल सावंत, आयएसओ रुपाली शिंदे,एडिटर रुपाली मोरे व ,सीसी संयुक्ता देवकूळे यांनी २०२४-२५ वर्षाकरिता पदभार स्वीकारला.
या वेळी कार्यकारिणी सदस्या रेखा चिरगुटे ,निता मुळे,प्राजक्ता पवार, पल्लवी मेणबुदले,भाग्यश्री सरडे व दिपाली सावंत यांचे ही स्वागत केले.
या वेळी नूतन अध्यक्षा सुनीता पानसे यांनी इंटरनॅशनल इनरव्हील थीम मानवतेचे हृदयस्पंद याबद्दल माहिती देत क्लबच्या सर्व पदाधिकारी,एक्झिक्युटिव्ह कमिटी, क्लब मेंबर्स यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली आणि आतपर्यंत केलेल्या व पुढील नियोजित प्रकल्पाबाबत माहीत दिली.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून एकूण सात गरजू मुलींना क्लब च्या वतीने सायकल वाटप करण्यात आले. इनरव्हील क्लब परिवारात नव्याने सामील झालेल्या सदस्यांना पिन प्रधान करत शपथ देवून पीडीसी रोहिणी वैद्य यांच्यासह सदस्यांनी स्वागत केले. प्रमुख पाहुण्या स्वाती हेरकळ यांनी रोटरीमध्ये केलेल्या अनेक प्रोजेक्ट ची माहिती देवून सर्वांना प्रेरित केले अणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. एडिटर रुपाली मोरे यांच्या संकल्पनेतून तयार केलेल्या संगिणी या पहिल्या बुलेटिनचे प्रकाशन करण्यात आले या नंतर लकीड्रॉ साठी कूपन देऊन गिफ्ट देण्यात आले.
जयश्री भाडळकर यांनी सूत्रसंचालन केले. सरिता जमदाडे यांनी आभार मानले. यावेळी स्वाती बिरामने, आदिती भांगडिया, डॉ.प्रेरणा ढोबळे, सुनील संकपाळ, सतीश पानसे, प्रदीप भोसले, श्रीकांत पवार,लेसान अझादी,सोपान सामंता यांच्या सह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.