Post Views: 69
हजारमाची माध्यमिक विद्यालयाचे कुस्ती स्पर्धेत यश
कराड प्रतिनिधी –कवठे ( मसूर) ता कराड येथे झालेल्या कराड तालुकास्तरीय शालेय शासकीय कुस्ती स्पर्धेत यशवंत शिक्षण संस्थेचे माध्यमिक विद्यालय हजारमाची येथील राजीवर्धन अजय भोगे यांने ५१ किलो वजनी गटात तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. त्याची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.त्याचे यशवंत शिक्षण संस्थेचे सचिव डी.ए.पाटील, संस्थेचे सर्व पदाधिकारी मुख्याध्यापिका मनिषा पानवळ ,क्रीडा शिक्षक अनिल जाधव , अंजली पाटील,सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी पालक यांनी अभिनंदन केले.
