यशोदा टेक्निकल कॅम्पस च्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्टतेचा ध्यास जोपासावा: डॉ. हेमंत अभ्यंकर
यशोदा टेक्निकल कॅम्पस मधील शैक्षणिक वातावरण यशस्वीतेसाठी पूरक: डॉ. हेमंत अभ्यंकर
इंजिनिअरिंग च्या विद्यार्थ्यांसाठी ‘आरंभ 2024’ प्रवेशोत्सव समारंभ संपन्न
सातारा :अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी आयुष्यामध्ये संयम बाळगणे अत्यंत महत्त्वाचे असून, विद्यार्थ्यांच्या छोट्या-छोट्या उपलब्धीसाठी पालक आणि शिक्षकांनी त्यांना प्रोत्साहित करायला हवे तसेच सर्व विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट बनण्यासाठी जर प्रयत्न केले तर त्यातून सर्वोत्कृष्ट विद्यार्थी घडवता येतील असे प्रतिपादन शिक्षण तज्ञ डॉ. हेमंत अभ्यंकर यांनी यावेळी केले. यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्ष प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘आरंभ 2024’ या प्रवेशोत्सव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये ते प्रमुख पाहुणे आणि मार्गदर्शक म्हणून बोलत असताना त्यांनी यशोदा टेक्निकल कॅम्पस मधील शैक्षणिक सुविधांविषयी समाधान व्यक्त केले.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये पालकांसोबतच, शिक्षक शैक्षणिक संस्थांचा फार मोठा वाटा असतो. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी वर्ग खोल्यांमधील शिक्षणासोबतच शारीरिक संपदा कमावणे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे .
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलताना प्रा.अजिंक्य सगरे यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आणि अभियांत्रिकेतील यशाचा मूलमंत्र यावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले विद्यार्थ्यांनी दररोज थोडी-थोडी प्रगती साध्य केल्यास सरते शेवटी आकाशाला गवसणी घालणारे यश मिळवता येते.
यावेळी बोलताना कमांडर डॉ. प्रताप पवार यांनी भारत देशाचे संशोधन क्षेत्रातील कार्य याचा आढावा घेत असताना विद्यार्थ्यांनी कशाप्रकारे कल्पकता जोपासणे आवश्यक आहे, याबद्दल त्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या कौशल्य विकास विषयी देखील मार्गदर्शन केले.
प्रमुख मार्गदर्शकांमध्ये सनदी लेखापाल राजेश्वर कासार यांनी देखील नवीन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कोणत्याही उद्योग व्यवसायामध्ये आणि त्याच्या यशस्वी वाटचालीमध्ये वित्तीय व्यवस्थापनाचे असणारे अनन्यसाधारण महत्त्व याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सदरच्या कार्यक्रमांमध्ये पालक आणि विद्यार्थ्यांनी आपले अभिप्राय व्यक्त केले. नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांपैकी उत्कृष्ट गुणांनी केंद्रबूत प्रवेश प्रक्रियेतून प्रवेश मिळवलेल्या विद्यार्थी आणि पालकांचा देखील सत्कार करण्यात आला. . यावेळी साताऱ्यातील नामवंत उद्योजक श्री नितेश मोरे देखील उपस्थित होते. यशोदा टेक्निकल कॅम्पसचे संचालक डॉ. विवेककुमार रेदासणी, यशोदा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग चे प्राचार्य डॉ. विक्रम पाटील यांनी देखील उपस्थितना मार्गदर्शन केले. यशोदा टेक्निकल कॅम्पसचे सहसंचालक प्रा. मोहिते, कुलसचिव गणेश सुरवसे, प्राचार्य डॉ.विठ्ठल चावरे हे देखील उपस्थित होते. स्वागत विभाग प्रमुख डॉ.शिवदे यांनी केले, आभार प्रदर्शन प्रा. पाटील यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.अमृता मोहिते यांनी केले.
