देशी बनावटीचे पिस्टल सह आरोपीस केले जेरबंद भुईंज पोलिसांची कारवाई

दिनांक 28 /8 /26 रोजी रात्री 02.15 वा चे सुमारास पृथ्वीराज ताटे सहाय्यक पोलीस निरीक्षक भुईंज पोलीस ठाणे सोबत पोलीस हवालदार नितीन जाधव, आप्पा कोलवडकर , पोलीस शिपाई सोमा बल्लाळ, सागर मोहिते असे सरकारी वाहनातून पोलीस ठाणे हद्दीतील मौजे कवठे तालुका वाई गावचे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना सपोनि पृथ्वीराज ताटे यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की मौजे सुरुर तालुका वाई गावचे हद्दीत सुरूर ब्रिज चे खाली इसम नामे प्रसाद शुक्राचार्य बागल राहणार सुरूर तालुका वाई हा अंगामध्ये ग्रे कलरचा फुल बाह्याचा टीशर्ट काळा रंगाचा हाफ बरमुडा घालून उभा असून त्याचे कमरेला पिस्टल लावलेली आहे अशी माहिती मिळाल्यानंतर हवालदार कोलवडकर यांनी लागलीच दोन पंचांना बोलावून घेतले व त्यानंतर सपोनी पृथ्वीराज ताटे व सोबत असलेल्या पोलीस स्टाफ व पंच यांनी मिळाले माहितीचे ठिकाणी जाऊन खात्री केली असता वरील वर्णनाचा इसम संशयितरित्या सुरुर ब्रिज खाली उभा असलेला दिसला त्यास ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कमरेला एक देशी बनावटीचे पिस्तूल मिळून आले म्हणून सदर आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे गु र नंबर 289/ 26 शस्त्र अधिनियम कलम 3 /25 सह महा.पो.आधी.कलम 37 ( 1) (3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर आरोपीस माननीय प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, वाई यांचे समोर हजर केले असता माननीय न्यायालयाने त्याची 4 दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे .सदर आरोपीकडून 45,000/- रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्टल जप्त करण्यात आले आहे
सदर कारवाई माननीय श्री निखिल पिंगळे पोलीस अधीक्षक सो सातारा माननीय डॉक्टर वैशाली कडूकर अप्पर पोलीस अधीक्षक सातारा माननीय श्री सुनील साळुंखे उपविभागीय पोलिस अधिकारी वाई वाई यांचे मार्गदर्शनाखाली माननीय पूनम झगडे परी.पोलीस उपाधीक्षक भुईंज पोलीस ठाणे पी वाय ताटे सहाय्यक पोलीस निरीक्षक भुईंज पोलीस ठाणे पोलीस हवलदार नितीन जाधव ,आप्पा कोलवडकर पोलीस शिपाई सोमनाथ बल्लाळ, सागर मोहिते यांनी पूर्ण केली असून पुढील तपास पीएसआय आकाश मोरे करीत आहेत.



