Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » अत्याधुनिक सीटी स्कॅनचा साताऱ्यात शुभारंभ सेवाभावी रुबी हॉल क्लिनिकचा उपक्रम !

अत्याधुनिक सीटी स्कॅनचा साताऱ्यात शुभारंभ सेवाभावी रुबी हॉल क्लिनिकचा उपक्रम !

अत्याधुनिक सीटी स्कॅनचा साताऱ्यात शुभारंभ सेवाभावी रुबी हॉल क्लिनिकचा उपक्रम !

गेली पाच दशके रुबी हॉल विविध माध्यमातून रुग्णांची अव्याहतपणे सेवा करत आहे. या पन्नास वर्षांच्या कार्यकालात रुबीला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले. काही गोष्टी आपल्या नावावर करण्याचा पहिला मानही मिळविला. एमआरआय, सीटी स्कॅन यासारख्या सुविधा प्रथमतः रुबी हॉलनेच दिल्या. आता ही सीटी स्कॅनची सुविधा रुबी हॉल साताऱ्यात सुरु करीत आहे यानिमित्ताने…

महाराष्ट्रातील अनेक शहर व ग्रामीण भागात अत्याधुनिक एमआरआय, सीटी स्कॅन सेंटर्स सुरु करण्यात आली आहेत. ही सेंटर्स रुग्णांना नवसंजीवनी ठरली आहेत. रुबी नेहमीच काळाच्या एक पाउल पुढे रहात आली आहे. रुग्णांचे हित कायम लक्षात ठेवून वाटचाल करणाऱ्या सेवाभावी रुबी हॉल क्लिनिक साताऱ्यात सिमेन्स सीटी स्कॅनचा शुभारंभ करीत आहे. गुरूवार, दिनांक १० ऑक्टोबर २४ रोजी सकाळी १०.३० वाजता प्रसिद्ध उद्योजक आणि कूपर कार्पोरेशनचे मॅनेजिंग डायरेक्टर मा. फरोख कूपर यांचे हस्ते आणि प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ आणि ग्रांट मेडिकल फौंडेशनचे मॅनेजिंग डायरेक्टर मा. डॉ. परवेझ ग्रांट यांच्या उपस्थितीत हा शुभारंभ सोहळा होणार आहे.

सीटी स्कॅन शुभारंभ निमित्ताने रुग्णांसाठी त्याच दिवशी सातारा येथील रुबी हॉल क्लिनिकमध्ये सकाळी १० ते १२ या वेळेत आणि दुपारी १ ते ३ या वेळेत मिशन हॉस्पिटल, वाई येथे मोफत हृदयरोग तपासणी शिबिर आयोजित केले असून हृदयविकारासंबंधी असलेला सीटी स्कॅन संपूर्णपणे मोफत केला जाणार आहे. उच्च दर्जाची निदान पद्धती असलेल्या एमआरआय ३ टेस्लावर आपले एमआरआय आणि अत्याधुनिक सिमेन्सच्या मशीनवर सीटी स्कॅन करुन घ्यावे, जेणे करून आपले निदान योग्य आणि अचूक होईल व आपल्या डॉक्टरांना उपचार करणे सुलभ आणि सोयीचे होईल. तरी या संधीचा रुग्णांनी जरूर लाभ घ्यावा, असे आवाहन रुबी हॉल क्लिनिकचे असिस्टंट जनरल मॅनेजर डॉ. संजय लावंड यांनी केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सह्याद्रि कारखान्यासाठी तिरंगी लढत; 21 जागांसाठी 70 उमेदवार निवडणूक रिंगणात

Post Views: 33 सह्याद्रि कारखान्यासाठी तिरंगी लढत; 21 जागांसाठी 70 उमेदवार निवडणूक रिंगणात सह्याद्रि सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी शुक्रवारी उमेदवारी

Live Cricket