महाबळेश्वर वनपरिमंडळ अधिकारी सुनील लांडगे यांच्या पथकाची मोठी कारवाई; खवले मांजर खवले जप्त येवती येथे शिवतेज सामाजिक संस्थेच्या वतीने शिवजयंती निमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर व भव्य लेझीम पथकाचा कार्यक्रम  प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे कामकाज आदर्शवत वर्धापन दिनी जिल्हा परिषद अध्यक्षा मा.डॉ.सौ. प्रियाताई शिंदे यांची सदिच्छा भेट केळघर येथे उद्या महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन श्रीक्षेत्र पार्वतीपूर पारसोंड येथे आदिशक्ती श्रीरामवरदायिनी मातेचा यात्रोत्सव; सोळाव्या वर्षीही विविध सामाजिक व क्रीडा स्पर्धांचा जागर! पाचगणी पोलीस ठाणे हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार भरत तुकाराम मालुसरे हा सातारा जिल्हयातुन २ वर्षाकरीता तडीपार 
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » हेमलता शिंदे यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार

हेमलता शिंदे यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार

हेमलता शिंदे यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार

पिंपोडे बुद्रुक, ता. ७ : आसनगाव (ता. कोरेगाव) येथील सरपंच हेमलता शिंदे यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत राज्यस्तरीय ‘आदर्श सरपंच’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अहिल्यानगर येथे स्वराज्य सरपंच सेवा संघाच्या वतीने आयोजित विशेष कार्यक्रमात हा गौरव सोहळा पार पडला.

ग्रामविकास, स्वच्छता, जलसंधारण, तसेच विविध लोकहिताच्या उपक्रमांत त्यांनी केलेल्या प्रभावी कामगिरीमुळे त्यांची निवड करण्यात आली. गावातील पायाभूत सुविधा उभारणीसह नागरिकांच्या सहभागातून विकास साधण्यावर त्यांनी विशेष भर दिला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आसनगावने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती साधली आहे. 

या सोहळ्यात महंत श्रीकांत महाराज धुमाळ, हवामान अभ्यासक पंजाबराव डक आणि बाबासाहेब पावसे यांच्या हस्ते हेमलता शिंदे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्या पद्मावती शिंदे, साधना यादव, स्वाती चव्हाण, भानुदास शिंदे, विश्वास यादव, कालिदास यादव, संतोष शिंदे, संभाजी शिंदे, गजेंद्र शिंदे, वैभव शिंदे, गणेश शिंदे, श्रीकांत जाधव, अभिजित शिंदे यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर ग्रामस्थांनी शिंदे यांचे अभिनंदन करत त्यांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. या यशामुळे आसनगावच्या विकासकामांना अधिक गती मिळेल, असा विश्वासही हेमलता शिंदे यांच्या वतीने व्यक्त करण्यात आला. या पुरस्काराबद्दल ग्रामपंचायत सदस्य विक्रम भोसले, शुभांगी चव्हाण, ग्रामसेविका प्रेरणा सपकाळ, सातारा जिल्हा खरेदी विक्री संघांचे संचालक अनिल शिंदे, माजी सरपंच वसंत शिंदे, घनश्याम गुरव, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन मारुती शिंदे, व्हाईस चेअरमन रतनसिंग शिंदे, माजी चेअरमन नितीन धुमाळ, राजेंद्र जाधव, संचालक विनोद कळंबे, दीपक गायकवाड, लिलावती शिंदे, बेबीताई शिंदे, लिलावती शिंदे, तसेच यात्रा कमिटी आदींनी अभिनंदन केले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महाबळेश्वर वनपरिमंडळ अधिकारी सुनील लांडगे यांच्या पथकाची मोठी कारवाई; खवले मांजर खवले जप्त

महाबळेश्वर वनपरिमंडळ अधिकारी सुनील लांडगे यांच्या पथकाची मोठी कारवाई; खवले मांजर खवले जप्त खवले मांजराचे खवले तस्करी प्रकरणी वनविभागाची धडक

Live Cricket