Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी सौ.प्रमिला शिंदे यांची निवड

राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी सौ.प्रमिला शिंदे यांची निवड

राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी सौ.प्रमिला शिंदे यांची निवड

कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी सोडवून त्यांना न्याय मिळवून देणारा :  जिल्हा उपाध्यक्ष प्रमिला शिंदे यांचा कर्मचाऱ्यांना शब्द

सातारा :- सरकारी कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या आणि त्यांना न्याय मिळवून देणाऱ्या राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी सातारच्या सौ प्रमिला नंदकुमार शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आले असून त्यांना या पदाचे नियुक्ती पत्र पदाधिकाऱ्यांच्या हस्ते देण्यात आले. 

  आगामी काळात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून आपल्या सरकारी कर्मचाऱ्याला हक्काचा न्याय मिळवून देण्यासाठीच या पदाचा उपयोग करणार असून आजवर संघटनात्मक केलेल्या कामाची ही पोचपावती असेल असे देखील मत या प्रसंगी प्रमेला शिंदे यांनी बोलताना व्यक्त केले.

  गेली सलग तीस वर्ष राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी विविध पदावर राहून कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्काला वाचा फोडली आहे. संघटनात्मक कामामुळेच त्यांनी आजवर सातारा शहराध्यक्ष ते जिल्हा उपाध्यक्ष पर्यंत आपली झेप घेतली आहे. सध्या प्रमिला शिंदे या जिल्हा शासकीय रुग्णालय येथून आरोग्य सेविका म्हणून सेवानिवृत्त झाल्या असून त्या आता संघटनात्मक कामामध्ये सक्रिय झाल्या आहेत. आगामी काळात सरकार दरबारी कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढा उभारूण प्रत्येक कर्मचाऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठीच प्रयत्न करणार असल्याची भावना देखील त्यांनी या वेळेला बोलून दाखवली.

  सौ. प्रमिला शिंदे यांची जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे जिल्ह्यातील विविध पदाधिकारी कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

Live Cricket