कृष्णा नदीच्या संरक्षण, आणि संवर्धन यावर विषयावर “चला सुरुवात करूया” या विशेष कार्यशाळेचे शुक्रवार दि. २९ नाेव्हेंबर राेजी आयाेजन
वाई, दि. २९ : कृष्णा नदीच्या संरक्षण, आणि संवर्धन यावर विषयावर “चला सुरुवात करूया” या विशेष कार्यशाळेचे शुक्रवार दि. २९ नाेव्हेंबर राेजी आयाेजन करण्यात आले आहे.
“चला सुरुवात करूया” या विशेष कार्यशाळेचे शुक्रवार दि. २९ नाेव्हेंबर राेजी येथील लाेकमान्य टिळक वाचनालय येथे सकाळी ९.१५ वा. ते १.३० वा. पर्यंत आयाेजन करण्यात आले आहे.
या कार्यशाळेत कृष्णा नदीच्या संरक्षण, आणि संवर्धन यावर विचार मंथन करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कृष्णा नदी फक्त आपली नैसर्गिक संपत्ती नाही, तर आपल्या इतिहासाचा आणि सांस्कृतिक वारशाचा एक महत्त्वाचा भाग आहे. परंतु, बदलत्या काळानुसार आपण या नात्याला कितपत जपले आहे? आज नदी आणि पर्यावरणासमोरील आव्हाने किती गंभीर आहेत, आणि आपण या समस्यांवर कोणते ठोस उपाय शोधू शकतो, हे ठरवण्याची वेळ आली आहे. वाई शहराला कृष्णा नदीने केवळ पाणीपुरवठाच नाही, तर परंपरा, निसर्गसौंदर्य आणि सामाजिक जीवनाची ओळख दिली आहे. ही नदी आपल्यासाठी कृष्णा माई” आहे, परंतु आज ती आपल्या सहकार्याची, संवर्धनाची आणि जपणुकीची वाट पाहत आहे.आपल्याला हे लक्षात घ्यावे लागेल की बदलत्या काळात नदीच्या अस्तित्वाला अनेक प्रकारच्याआव्हानांचा सामना करावा लागतो आहे. शहरीकरण, प्रदूषण, आणि विसरलेल्या परंपरा यामुळे नदीचीस्थिती दिवसेंदिवस बिघडत आहे. या पार्श्वभूमीवर, ही कार्यशाळा म्हणजे आपल्याला मिळालेली एकअनमोल संधी आहे. आपल्या नदीसाठी काहीतरी करण्याची! आज आपण “शोध, संवाद, विकास” या त्रिसूत्रीच्या आधारे काम करणार आहोत.
या कार्यशाळेमध्ये प्रामुख्याने आपल्या नदीचा सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि सामाजिक वारसा नव्याने समजून घेण्यात येणार आहे. तसेच नागरिक, हितधारक आणि शासकीय यंत्रणा यांच्यातील चर्चा करून एकमेकांचे दृष्टिकोन समजून घेणार आहाेत. योग्य आणि परिणामकारक उपाय शोधून त्यावर कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे.
या सत्रामध्ये प्रत्येक सहभागीचे योगदान अतिशय महत्त्वाचे आहे. आपल्या व्यक्तिगत अनुभवांनी,कल्पनांनी आणि चर्चेतून नदीच्या संरक्षणासाठी एक ठोस दिशादर्शन होईल. आज आपण केवळ समस्या मांडणार नाही, तर त्यावर उपाय शोधून त्याची अंमलबजावणी करण्यासाठीही पुढाकार घेणार आहोत.
कृष्णा नदी सेवाकार्य फौंडेशनच्याचे सर्व सेवेकरी सेवा वृत्तीनं गेली आठ नऊ वर्षे *पुरातन ठेव्याचे संवर्धन।याचसाठी कार्यरत फौंडेशन नदी व घाट स्वच्छता तर रविवारी सातत्याने करीत आहे.हीच वेळ आहे आपण सर्वानी एकत्र येऊन कृष्णा नदीच्या उज्ज्वल भविष्याचा विचार करू. तिच्या अस्तित्वासाठी सकारात्मकता आणि दृढ संकल्पाने काम करूया. ही नदी आपल्यासाठी आहे, आणि आपण तिच्यासाठी काहीतरी करणे ही आपल्या पुढच्या पिढ्यांसाठीदेखील एक मोठी देणगी असेल.
आपण सर्वांचे या कार्यशाळेत आपण सर्वांनी एकत्र काम करून आपल्या नदीसाठी आपले याेगदान देण्यासाठी जास्तीत जास्त लाेकांनी सहभागी व्हावे असे आवाहन कृष्णानदी सेवाकार्य फौंडेशन वाई मार्फत करण्यात येत आहे.