ऊसाच्या शेतातील चार कोल्ह्यांच्या पिल्लांना आईने सुखरूप नेले! वनविभागाच्या सतर्कतेमुळे वन्यजीवांचे नैसर्गिक अधिवासात सुरक्षित पुनर्मिलन गोकुळ सत्तासंघर्ष! महायुतीचे राजेश‌ पाटील अध्यक्ष शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; शासन खंबीरपणे पाठिशी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह्याद्रीच्या समृद्ध वनांवर कुऱ्हाड भीमाशंकर व कर्जत परिसरातील वृक्षतोडीविरोधात ‘टायगर ग्रुप’ आक्रमक आंदोलनाचा इशारा धन्वंतरी पतसंस्थेमध्ये धन्वंतरी जयंतीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी केले ‘मीडिया सेवन’च्या दिवाळी अंकाचे स्वागत! संपादिका मुस्कान तांबोळी यांनी दिवाळी अंक भेट देत उपक्रमाची दिली माहिती
Home » खेळा » स्पेन वर्ल्ड फुटबॉल चॅम्पियन! थरारक सामन्यात अर्जेंटिनावर १-० ने मात

स्पेन वर्ल्ड फुटबॉल चॅम्पियन! थरारक सामन्यात अर्जेंटिनावर १-० ने मात

स्पेन वर्ल्ड फुटबॉल चॅम्पियन! थरारक सामन्यात अर्जेंटिनावर १-० ने मात

फिफा वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील अंतिम सामना स्पेन आणि अर्जेंटिना या दोन्ही संघांमध्ये पार पडला. गतविजेत्या अर्जेंटिनाला हा सामना जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं. 

 एक्स्ट्रा टाईममध्ये गेलेल्या या सामन्यात स्पेनने १-० ने बाजी मारुन अर्जेंटिनावर थरारक विजय मिळवला आहे. फेरान टॉरेसच्या एकमेव गोलच्या बळावर स्पेनने अर्जेंटिनावर ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. यासह तब्बल १६ वर्षांनंतर फिफा वर्ल्डकपवर नाव कोरलं आहे.

या सामन्यातील सुरुवातीच्या ९० मिनिटांत दोन्ही संघांना एकही गोल करता आला नव्हता. पण त्यानंतर झालेल्या एक्स्ट्रा टाईममध्ये असं काही घडलं, ज्याची कोणी अपेक्षाही केली नसेल. सामन्यातील १०६ व्या मिनिटाला स्पेनचा स्टार विंगर फेरान टॉरेसने ऐतिहासिक गोल केला. हा या संपूर्ण सामन्यातील एकमेव गोल ठरला. या गोलने स्पेनचा या सामन्यातील विजय निश्चित केला. यासह स्पेनने १६ वर्षांनंतर जेतेपदाचा दुष्काळ संपवला. तर अर्जेंटिनाचं लागापोठ दुसऱ्यांदा जेतेपदाची ट्रॉफी उंचावण्याचं स्वप्नं थोडक्यात भंगलं.

स्पेनला या सामन्यातील पहिला गोल करण्यासाठी १०६ मिनिटे वाट पाहावी लागली. फेरान टॉरेस योग्यवेळी अचूक ठिकाणी पोहोचला आणि अचूक टायमिंग साधून त्याने गोल केला. यासह अर्जेंटिनावर १-० ने आघाडी मिळवून दिली. यादरम्यान स्पेनचा १ गोल अमान्य घोषित करण्यात आला होता. पण तरीदेखील स्पेनने दमदार पुनरागमन केलं.

स्पेनला जेतेपदाची ट्रॉफी उंचावण्यासाठी १६ वर्षे वाट पाहावी लागली आहे. याआधी २०१० मध्ये झालेल्या फिफा वर्ल्डकप स्पर्धेत स्पेन आणि नेदरलँड्स हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. हा सामना देखील स्पेनने १-० ने जिंकून इतिहासाला गवसणी घातली होती. यासह स्पेनने पहिल्यांदाच वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावली होती. त्यावेळी सामन्यातील ११६ व्या मिनिटाला अँड्रेस इनिएस्ताने गोल करुन स्पेनला १-० ने आघाडी मिळवून दिली होती. 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

ऊसाच्या शेतातील चार कोल्ह्यांच्या पिल्लांना आईने सुखरूप नेले! वनविभागाच्या सतर्कतेमुळे वन्यजीवांचे नैसर्गिक अधिवासात सुरक्षित पुनर्मिलन

ऊसाच्या शेतातील चार कोल्ह्यांच्या पिल्लांना आईने सुखरूप नेले! वनविभागाच्या सतर्कतेमुळे वन्यजीवांचे नैसर्गिक अधिवासात सुरक्षित पुनर्मिलन नेर : मौजे नेर (ता.

Live Cricket