डॉ.अजिंक्य सगरे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘ज्ञानदीप दिन’; यशोदा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समध्ये ज्ञानोत्सवाचे आयोजन! महाराष्ट्राच्या सहकार चळवळीचा वारसा देशभर पोहोचविण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कृषी व अन्य शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी व फार्मर आयडी तातडीने तयार करावा महान आदिवासी स्वातंत्र्यसैनिक भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनाकडून अभिवादन भारताचा रोमहर्षक विजय, पाकिस्तानवर १ विकेटने मात, टीम इंडिया आशिया चॅम्पियन चित्रपट पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन विभाग आणि महाराष्ट्र चित्रपट,रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्यात सामंजस्य करार
Home » राज्य » प्रशासकीय » महाराष्ट्राच्या सहकार चळवळीचा वारसा देशभर पोहोचविण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

महाराष्ट्राच्या सहकार चळवळीचा वारसा देशभर पोहोचविण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

महाराष्ट्राच्या सहकार चळवळीचा वारसा देशभर पोहोचविण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

पुण्यात सहकार मंत्रालयाचे पश्चिम विभागीय कार्यालय सुरू

पुणे, दि. १५ : महाराष्ट्राच्या सहकार चळवळीचा समृद्ध वारसा देशभर पोहोचविण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून, देशाच्या पश्चिम विभागातील सहकारी संस्थांना मार्गदर्शन व सहकार्य करण्यासाठी पुण्यात सहकार मंत्रालयाचे पश्चिम विभागीय कार्यालय सुरू करण्यात येत आहे. तळेगाव येथील बंद पडलेली नॅशनल हेवी इंजिनिअरिंग को-ऑपरेटिव्ह लिमिटेड ही बहुराज्य सहकारी संस्था दीड हजार कोटी रुपयांच्या वित्तीय सहाय्याने पुन्हा कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सहकारी तत्त्वावर आधारित आणि कमिशनविरहित ‘भारत टॅक्सी’ सेवेमुळे टॅक्सीचालकांना केवळ चालक न राहता स्वतःच्या सेवेचे मालक होण्याची संधी मिळणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शाह यांनी केले.

तळेगाव येथे नॅशनल हेवी इंजिनिअरिंग को-ऑपरेटिव्ह लिमिटेड या बहुराज्य सहकारी संस्थेच्या पुनरुज्जीवन प्रकल्पाचे भूमिपूजन, पुण्यात सहकारी संस्थांचे केंद्रीय निबंधक (सीआरसीएस) यांच्या पश्चिम विभागीय कार्यालयाचे दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन आणि पुण्यासाठी ‘भारत टॅक्सी’ सेवेच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, केंद्रीय सहकार राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर, केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके, माजी आमदार संजय (बाळा) भेगडे तसेच केंद्रीय सहकार सचिव आशिषकुमार भुटानी उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

डॉ.अजिंक्य सगरे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘ज्ञानदीप दिन’; यशोदा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समध्ये ज्ञानोत्सवाचे आयोजन!

डॉ.अजिंक्य सगरे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘ज्ञानदीप दिन’; यशोदा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समध्ये ज्ञानोत्सवाचे आयोजन! ग्रंथपूजन, ग्रंथभेट, सारांश लेखन, उत्कृष्ट वाचक पुरस्कार आणि

Live Cricket